. पोंभूर्णा:- उमेद उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती पोंभूर्णा जिल्हा चंद्रपूर अंतर्गत मकर संक्रांति निमित्त एक दिवसीय सांस्कृतिक महिला संमेलनाचे आयोजन विर बाबुराव शेडमाके सभागृह येथे घेण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कु. अलका ताई आत्राम माजी सभापती मा.शुभांगी कनवाडे तहसीलदार मॅडम, श्रीमती सुनिता मरसकोल्हे गट विकास अधिकारी पंचायत समिती पोभूर्णा व श्री.राजेश दुधे तालुका अभियान व्यवस्थापक यांच्या उपस्थितीत घेण्यात आला . मकर संक्रात व सांस्कृतिक महिला संमेलन घेण्यामागचा उद्देश महिलांना कामाच्या व्यापातून तणावमुक्त करून त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये रांगोळी स्पर्धा, सामूहिक नृत्य स्पर्धा ,सिंगल नृत्य स्पर्धा, एकांकिका, गीत गायन या स्पर्धा घेण्यात आल्या.
तसेच या कार्यक्रमांसोबतच आंतरराष्ट्रीय मिलेट्स महोत्सव 2023 चे औचित्य साधून तालुकास्तरीय भरडधान्य च्या माध्यमातून विविध स्पर्धेचे सुद्धा आयोजन करण्यात आले यामध्ये ठेकवा पदार्थ, मिश्र कडधान्यापासून चकल्या, मक्यापासूनचे विविध पदार्थ त्यामध्ये मक्याची भाकर, मक्याचा हलवा , व्हेज पुलाव, मक्याचे वडे, मक्याची पकोडे व इतर अनेक पदार्थ बनवून सुद्धा प्रदर्शनी मध्ये आणण्यात आले होते .
या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी महिलांचा या उत्साह बघून त्यांनी समोर येऊन आपल्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी हा मंच उपलब्ध करून दिला बद्दल आनंद व्यक्त केले व महिलांनी याच प्रकारे उंच भरारी घ्यावी व आपली प्रगती साधावी यासाठी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाला तालुक्यातील तहसीलदार मॅडम व गटविकास अधिकारी मॅडम तसेच माजी सभापती मॅडम एकत्र येऊन उमेद अभियानातील सर्व कॅडर्स सोबत एक दिवस सर्व महिलांच्या सोबत, आनंदात सहभागी होता आले व कामाच्या व्यापातून या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होता आले याबाबत सर्व मान्यवरांनी आनंद व्यक्त केला. वरील स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या स्पर्धकांना तालुका अभियान व्यवस्थापक यांच्यातर्फे पारितोषिक देण्यात आले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सर्व कॅडर ,सर्व मॅनेजर तसेच तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातील सर्व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.