विजय जाधव मूल तालुका प्रतिनिधी
कवी कुलगुरू संस्कृत विद्यापीठ रामटेक जिल्हा नागपूर छत्र वीर राजे संभाजी प्रशासकीय सेवा महाविद्यालय मोरवा जिल्हा चंद्रपूर द्वारा राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील असलेल्या बहुचर्चित नांदगाव येथे सात दिवशीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खडतर मार्ग पत्करून विद्यार्थ्यांनी आपले जीवन सुखमय करावे, शैक्षणिक दृष्ट्या जीवनात संघर्ष करताना महापुरुषांचा आदर्श ठेवून पुढे चालावे तरच आपला जीवन सुखमय होऊ शकतो असे प्रतिपादन माननीय दशरथ भाऊ वाकुडकर यांनी व्यक्त केले.
ते राष्ट्रीय सेवा योजना नांदगाव येथील शिबिराच्या उद्घाटना समारंभ बोलत होते यावेळी अध्यक्ष म्हणून माननीय सुभाषजी ठोंबरे हे होते विशेष अतिकी म्हणून गावच्या प्रथम नागरिक सरपंच एडवोकेट हिमानी वाकुडकर यांनी या शिबिराला सहकार्य करून गावाच्या विकास कार्यात हातभार लावावा अशी विनंती केली याप्रसंगी नांदगावचे माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांबोडे यांनी सुद्धा बेरोजगारांनी नोकरीची कास न धरता स्वतःचा व्यवसाय करावा आणि आपलं जीवन समृद्ध करावा व्यवसायाच्या माध्यमातून पुढे जावे शेतकऱ्यांनी शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळावे असे आवाहन केले .
त्याचप्रमाणे चेतन जाधव आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचेही समायोजित मार्गदर्शन शिबिराप्रसंगी लाभले लोकजागर कार्यक्रमात शिबिराच्या माध्यमातून सात दिवसात नांदगाव येथे अनेक कार्यक्रम राबविण्यात आले गावातील संपूर्ण स्वच्छता करण्यात आली जनजागृतीवर अनेक उपक्रम सात दिवसात राबविण्यात आले माननीय प्राध्यापक दिलीप जी चौधरी यांचे सुद्धा समरूपय कार्यक्रमात मौलिक मार्गदर्शन गावकर यांना लाभले ग्रामस्थांची उदासीनता आणि अनुपस्थिती पाहून मान्यवरांनी नाराजी व्यक्त केली गावात जनजागृती असताना गावकऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा असून अशा राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाला भविष्यात तरी गावकऱ्यांनी साथ द्यावी अशी विनंती माननीय प्राध्यापक दिलीप चौधरी यांनी केली राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम दैनंदिन साफसफाई विविध योजनेच्या माध्यमातून जनतेला माहिती शैक्षणिक दृष्ट्या विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली यामुळे या गावच्या सरपंच कुमारी हिमानीताई वाकुडकर यांनी राजे संभाजी प्रशासकीय सेवा महाविद्यालयाचे आणि तेथील संपूर्ण विद्यार्थ्यांचे आभार मानले