पहिले विदर्भ स्तरीय पर्यावरण संमेलन राजुरा येथे संपन्न
पहिले विदर्भ स्तरीय पर्यावरण संमेलन राजुरा येथे नुकतेच संपन्न झाले. यावेळी मानव -वन्यजीव संघर्ष टाळण्याकरिता उपाययोजना असा भव्य देखावा तयार करण्यात आला होता. तसेच याच ठिकाणी वनविभाग राजुरा चे वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड व नेफडो चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले यांच्या मार्गदर्शनात सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला होता. टेंबूरवाही क्षेत्र सहाय्य्क संतोष संगमवार यांच्या अथक परिश्रमातुन हा सेल्फी पॉईंट वनविभाग राजुरा यांनी साकारला होता. यावेळी या संमेलनाचे उदघाट्क नामदार सुधीर मुनगंटीवार, मंत्री – वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय यांनी या ठिकाणी सेल्फी घेतला. यावेळी त्यांच्या सोबत संमेलनाचे स्वागताध्यक्ष देवराव भोंगळे, नेफडो चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले हे उपस्थित होते.
ग्रामीण भागाशी नाळ जुळलेले वनमंत्री हे नेहमीच सामान्यातील सामान्य घटकांशी जुडलेले असून वनविभागाचा चेहरा मोहरा बदलून विकास कामानी नेहमीच चर्चेत असतात.