व्यवसायाच्या माध्यमातुन रोजगार निर्मिती करणारे व्यवसायिक समाजाचे भुषण – आ. किशोर जोरगेवार

0
626

व्यवसायाच्या माध्यमातुन रोजगार निर्मिती करणारे व्यवसायिक समाजाचे भुषण – आ. किशोर जोरगेवार

रोटरी क्लबच्या वतीने बिजनेस लिडर समीटचे आयोजन

रोजगार हा मोठा प्रश्न सध्या देशात निर्माण झाला आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेता भविष्यात ही समस्या आणखी भीषण होत जाणार असा तज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे आता युवकांनी रोजगार मागण्या एैवजी व्यवसायातून रोजगार देण्याची भूमिका स्वीकारली पाहिजे. व्यवसाय हाच आता बेरोजगारीवरील कारगर उपाय आहे. आजच्या या कार्यक्रमात सन्मानीत प्रत्येक व्यवसायीक रोजगार देण्याचे काम करत असुन व्यवसायाच्या माध्यमातुन रोजगार निर्मिती करणारे हे व्यवसायीक समाजाचे भुषण असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

रोटरी क्लबच्या वतीने सिडिसीसी बँकेच्या मा.सा कन्नमवार सभागृहात बिजनेस लिडर समिटचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला रोटरी क्लब तथा माता महाकाली महोत्सव समीतीचे अध्यक्ष अजय जयस्वाल, एमआयडीसी चंद्रपूर असोसिएशन चे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा, प्रदीप माहेश्वरी, नागपूर येथील आयआयएम चे संचालक डॉ. भीमराया मेत्री, आर अॅंन्ड वाय लॉजीस्टीकचे संचालक शिवकुमार राव, चड्डा गृपचे संचालक मोहित चड्डा, मुल येथील ग्रेटा एनर्जीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप गोयल, रवी जुनारकर, अनुप भाम्ब्री, प्रणव पवार, डॉ. अप्रतिम दीक्षित, आर सी प्लास्टो टँक अँड पाईप्स प्रा. लि. चे संचालक विशाल अग्रवाल, विजय आईंचवार, आदिंची उपस्थिती होती.

यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, विदर्भात आणि विशेषताह चंद्रपूरात नव्या व्यवसायाला साजेल असे वातावरण आहे. येथे व्यवसायीकांनी येथे व्यवसाय करावा, चंद्रपूरात उद्योग वाढले पाहिजे यासाठी लोकप्रतिनीधी म्हणुन माझे सतत प्रयत्न सुरु आहे. व्यवसाय करणा-र्यांना प्रोत्साहन देण्याची आपली भुमीका आहे. रोजगार मागण्यापेक्षा आता व्यवसायाकडे वढा यात शक्य ती मदत आपण करु असे यावेळी आ. जोरगेवार म्हणाले.

अनेक निराधार महिला रोजगार मिळण्यासाठी आमच्याकडे येतात. यातील प्रत्येकाला आपण रोजगार मिळवून देऊ शकत नाही. याची नेहमी खंत वाटायची. त्यामुळे यावर तोडगा म्हणून आपण चंद्रपूरात ग्रिन आटो ही संकल्पना राबवत आहोत. या संकल्पनेच्या माध्यमातून आपण निराधार महिलांना ई रिक्षा उपलब्ध करुन देणार आहोत. यातुन या महिलांना स्वत:च्या हक्काचा रोजगार उपलब्ध होणार आहे. तर अम्माची दुकान ही संकल्पनाही येत्या काळात आपण राबविणार असुन दिव्यांग बांधवांना रोजगारासाठी दुकान उपलब्ध करुन देण्याचा आमचा मानस असल्याचे ते यावेळी म्हणाले.

चंद्रपूरात व्यवसाय पुरक असे वातावरण आहे. येथे व्यवसाय वाढले पाहिजे. रोजगार वाढीसाठी सवलतीच्या दरात विज उपलब्ध करुन दिली पाहिजे अशी आपली मागणी आहे. व्यावसायीकांनी चंद्रपूरात यावे आणि उद्योग सुरु करावा, यासाठी स्थानिकांना रोजगार ही एकमात्र अट आमची असणार आहे. त्यांना लोकप्रतिनीधी म्हणुन शक्य ते सर्व सहकार्य करण्याची आमची भुमीका असणार असेही ते यावेळी म्हणाले.

रोटरी क्बल नेहमी समाजोपयोगी आयोजन करत असते. यावेळी बिजनेस लिडरला सन्मानीत करण्याचे काम त्यांच्या वतीने करण्यात आले आहे. बिजनेस लिडर बनने मोठे काम आहे. मात्र चंद्रपूरातील उन, थंडी आणि पाउस हे तिनही ऋतू झेलत काम करणारा माझा चंद्रपूरकर कुठे आणि कोणत्याही क्षेत्रात टिकून उल्लेखनीय काम करु शकतो आणि बिजनेस लिडर बुन शकतो असा विश्वास यावेळी त्यांनी बोलुन दाखवली. पूढच्या वेळी यापेक्षा मोठा बिजनेस समिट आयोजित करा अशी विनंती यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी रोटरी क्लबला केली. या प्रसंगी व्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्ययासायीकांचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here