डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र शासनाने तात्काळ न्यायालयात याचिका दाखल करावी!
चंद्रपूरातील अनेक सामाजिक संघटनेची मागणी!
चंद्रपूर । किरण घाटे
बहुचर्चित डाँ. पायल पडवी आत्महत्या प्रकरणात आरोपींवर निलंबनाची कारवाई न करणांऱ्या अधीष्ठाता आणि आरोग्य विज्ञान विद्यापिठाचे कुलगुरू यांच्या वर कारवाई करण्यात यावी .तदवतच उच्च शिक्षण घेणाऱ्या दलित-आदिवासी,बहुजन समाजातील विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण करणारी जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीना कोणत्याही सवलती न देता कठोर आणि न्याय निष्ठ भूमिका घेऊन डॉक्टर पायल तडवीला मृत्यूनंतर न्याय मिळावा या रास्त मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी,वंचित बहुजन महिला आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या वतीने नुकतेच राज्यभर प्रशासनाला निवेदने सादर करण्यांत आली.
चंद्रपुर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देखिल चंद्रपूर जिल्हाधिकारी यांना याच आशयाचे एक लेखी (मागणीचे) निवेदन देण्यात आले सदरहु निवेदन सादर करतांना वंचित बहुजन आघाडी चंद्रपूरच्या संयाेजिका तनुजा रायपूरे लताताई साव जयदीप खोब्रागडे( जिल्हा महासचिव वंचित बहुजन आघाडी ),धीरज तेलंग (जिल्हाध्यक्ष सम्यक विद्यार्थी आंदोलन),रामजी जुनघरे,रमेश ठेंगरे,मधुकर वानखेडे,नेहा मेश्राम,चंदा सहारे,पुष्पलता कोटांगले,अक्षय लोहकरे,हर्षवर्धन कोठारकर, सुकेशनी बेंदले,विवेक दुपारे,निखिल खोब्रागडे,राहुल मासुरकार,सुरज कदम,कबीर घोडमोडे आदि उपस्थित होते.