सर्व धर्मिय सामुदायिक विवाह सोहळा समिती, चंद्रपूर च्या वतीने सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचे आयोजन
अध्यक्ष पदी शोभाताई पोटदुखे
चंद्रपूर धर्मादाय आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य, मुंबईच्या वतीने या वर्षी सर्वधर्मिय विवाह सोहळयाचे आयोजन केले आहे. ज्यात आदिवासी, आत्महत्याग्रस्त शेतकरी, शहिद जवान, कोरोनामुळे मृत्यु पावलेल्यांची मुले, भटक्या जाती, विमुक्त जाती, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती व इतर मागासवर्गिय यांचे मुले-मुली व अनाथ मुले-मुली इत्यादी घटकांना या सामुदायिक विवाह सोहळयाचा आयोजनात प्राथमिकता दिली जाणार आहे. सदर सामुदायिक विवाह सोहळा हा १ फेब्रुवारी, २०२३ ते ३१ मे, २०२३ या कालावधीत आयोजित केला जाणार आहे. हा सामाजिक उपक्रम यशस्वीरित्या पार पाडावा या साठी चंद्रपूरचे सहाय्यक धर्मादाय आयुक्त श्रीमती पि.के. करवंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपूर जिल्हयातील धर्मादाय विश्वस्तांची सामुदायिक विवाह सोहळा आयोजन समितीची निवड करण्यात आली आहे. आयोजन समितीच्या अध्यक्षपदी सौ. शोभाताई पोटदुखे यांची निवड केली असून, इतर पदाधिकारी पुढील प्रमाणे आहेत. श्री. कैलाश खंडेलवाल – उपाध्यक्ष, श्री. निलम राचलवार – सचिव, श्री. रामदास वाघदरकर – कोषाध्यक्ष, सदस्य- अॅड. श्री. राजेश्वर एन. ढोक, सदस्य अॅड. श्री. मनोज ज. काकडे, अॅड. श्री. रितेश संघवी – सदस्य, अॅड. श्री. आशिष गुप्ता- सदस्य, श्री. उत्तमराव मोहितकर – सदस्य, श्री. धुन्नाजी – सदस्य श्री. योगेश पांडे- सदस्य श्री हर्षवर्धन सिंघवी – सदस्य, श्री. सुरेशजी लोहे – सदस्य श्री. मसुद अहमद – सदस्य, श्री. सुधाकरराव कडू- सदस्य यांची निवड करण्यात आली. नवनियुक्त समितीचे मा. सहा. धर्मादाय आयुक्त, चंद्रपूर यांनी अभिनंदन केले व सदर उपक्रम समाजातील सेवाभावी संस्था व इतर घटकांच्या सहकार्याने पार पाडण्याचे जाहिर आवाहन केले. तसेच नवनियुक्त अध्यक्ष सौ. शोभाताई. पोटदुखे यांनी परस्पर सहकार्याने हा उपक्रम प्रभाविपणे राबविण्याची व चंद्रपूर जिल्हयातील नागरीकांना सदर सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळाचा लाभ घ्यावा, अशी विनंती केली. कार्यालयाचे अधीक्षक श्री. आर. आर. ठाकरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.