– आता कोबडे सोडण्यासाठीही राजकारण्यांची केविलवाणी धडपड
पोंभूर्णा :- तालुक्यातील पोंभूर्णा पोलिस स्टेशन हद्दीत येत असलेल्या नवेगाव मोरे येथे कोंबडा बाजारावर पोलिसांनी धाड टाकली असता यातील तीघे पोलिसांच्या हाती लागले तर दोघे फरार आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून तीन टुव्हीलर,कोंबडे असा १ लाख ३६ हजार ६२० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अनेक दिवसांपासून या भागात कोंबडा बाजार भरत होता.यातून जुगार लावत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी मोठ्या शिताफीने कोंबडा बाजारावर धाड टाकून कार्यवाही करत तीघांना ताब्यात घेतले मात्र यातील दोघे फळ काढण्यात यशस्वी झाले.
धाडीतले कोंबडे सोडून देण्याची केवीलवाणी धडपड आजुबाजुच्या पुढाऱ्यांनी केली असल्यामुळे पुढाऱ्यांच्या कुशलतेची केविलवाणी धडपड पाहायला मिळाली.
राजकीय पुढाऱ्यांनी कातीचे कोंबडे सोडविण्यासाठी केलेली विणवणी व पोलिसांनी दिलेल्या नकाराची चर्चा सध्या गावात सुरू झाली आहे.
राजकीय आखाड्यात राजकीय चर्चा करणारे आता कोंबड्यांच्या लढाईतले कातीचे कोंबडे वाचविण्यासाठी ताकत लावताना दिसत आहेत.