गडचांदूर येथे विविध भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
कोरपना/प्रतिनिधी : सामाजिक प्रबोधनातून महाराष्ट्राला लाभलेले समाज प्रबोधनकार, कीर्तनकार यांच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडण्यासाठी कोरपना तालुक्यातील गडचांदुर येथील मेश्राम ले आऊट, प्रभाग क्रमांक 1 या ठिकाणी दिनांक 7 जानेवारी ते 9 जानेवारी पर्यंत 3 दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन “जय बजरंग सार्वजनिक बहुउद्देशीय संस्था, गडचांदूर या समीतीने केले आहे.
7 जानेवारी ला स्वच्छता अभियान, कीर्तन, श्री शिव शंकरजी मूर्ति मिरवणूक तसेच रात्रौ ला भारुड सम्राट ह.भ.प.जयवंत राव पाटिल केसगीर महाराज, नांदेड़ यांचा भारुड कार्यक्रम पहाटे पर्यन्त, 8 जानेवारी ला पहाटे 4 वाजता श्री हनुमानजी मूर्ति महाभिषेक पूजा व श्री शिवशंकर जी मूर्ति प्राणप्रतिष्ठा, भजन, कीर्तन व रात्रौ 8 वाजता सप्तखण्जेरी वादक ह.भ.प. सत्यपाल महाराज यांचे परम शिष्य ह.भ.प.पंकजपाल महाराज, वाशीम यांचे जाहिर मनोरंजन पर समाजप्रबोधन तसेच 9 जानेवारी ला श्री स्वामी चैतन्य महाराज, वढा यांची भव्य स्वागत मिरवणूक, लगेच प्रमुख पाहुण्यांचे स्वागत होणार आहे.
या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मूनगंटीवार, आमदार शुभाष धोटे, माजी आमदार वामनराव चटप, माजी आमदार संजय धोटे व इतर मान्यवरांची उपस्थिती असून या नंतर स्वामी चैतन्य महाराज यांचे जाहिर प्रवचन व दही हांडी नंतर लगेच महाप्रसादाचे आयोजन केले आहे. यासाठी जनतेने उपस्थित राहून मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.