घुग्घुस येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५४ वा पुण्यतिथी महोत्सव संपन्न
श्री. सत्यशिव गुरुदेव सेवा घुग्घुस मंडळातर्फे आयोजित ३० डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२२ रोजी २ दिवस मानवतेच्या महान पुजारी संत तुकडोजी महाराज यांच्या ५४ व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे साजरा करण्यात आला.
पुण्यतिथी महोत्सव २ दिवसांपासून आयोजन करण्यात आले.तसेच या बरेच दिवसांपासून दर सोमवार ला ग्राम सफाई अभियान श्री.सत्यशिव गुरुदेव मंडळ व जेष्ठ नागरिक यांच्या नेतृत्वात होत आहे.३१ डिसेंबर २०२२ शनिवार रोजी आदिवासी गोंडी ढेमसा सांस्कृतिक रॅलीनृत्य करत प्रत्येक वार्डा,वार्डातुन काढण्यात आली.
सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. तसेच सर्व धर्मीय पक्षातील नेते आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन श्री. सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळ अध्यक्ष श्री. मधुकर मालेकर, उपाध्यक्ष सुरेश बोबडे , संस्था सचिव नीलकंठ नांदे, कोषाध्यक्ष नारायणराव ठेंगणे,सचिव संजय भोंगळे,सहसचिव पुंडलिक खनके, संघटक पंढरी कातरकर, सदस्य ज्ञानेश्वर काळे,राजु भोंगळे, गंगाराम बोबडे, बालाजी धोबे, शामराव बोबडे,बंडु पिदूरकर,विठोबा बोबडे, जनार्धन गोबाडे, नंदुभाऊ ठेगणे,कवडू वाढई, लक्ष्मणराव ठाकरे, वासुदेव ठाकरे,सोनबाजी बदखल, जनाबाई निमकर,बहुजन आघाडी महिला शहराध्यक्षा सौ.उषाताई आगदारी,राजु काळे,मेपाल कांबळे,विनोद सातगरे ,बादल सातगरे,ज्ञानेश्वर सातगरे,रितेश कांबळे,आदित्य उरकुडे,दिलीप खांडेकर, गौरव चौधरी कार्यकारिणी परिसरातील नागरिक उपस्थित होते.