शासकीय आश्रमशाळा मंगी (खुर्द) येथील शिक्षकावर पोस्को लावा – बिरसा क्रांती दल ची मागणी

0
896

शासकीय आश्रमशाळा मंगी (खुर्द) येथील शिक्षकावर पोस्को लावा – बिरसा क्रांती दल ची मागणी

आदिवासी विकास विभागाच्या विकास कामांना गती देण्याचे काम हे आश्रम शाळेतील शिक्षक करतील ह्या आशेने ग्रामीण भागात आश्रम शाळा सुरू करण्यात आल्या. त्यातून सुरुवातीला अनेक विद्यार्थी घडून सामाजिक ,आर्थिक,व शैक्षणिक विकास करण्याच्या प्रयत्नात आहे. सध्या काही काळात आदिवासी आश्रम शाळेतील मुलींवर अत्याचाराचे प्रकार वाढतांना दिसत आहे. त्या अनेक शिक्षकाचा तसेच कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याने त्यांनां शिक्षा पण झाली आहे. तरी ही अनेक शिक्षक अजूनही आपला प्रताप सुरूच ठेवले आहेत.

शासकीय आश्रम शाळा मंगी येथील शिक्षकाने शाळेतील मुलींवर वाईट नजर ठेवून त्यांनां अश्लिल शिवीगाळ करून जातीवाचक शिवी दिली.प्रकरणाची माहिती आदिवाशी विकास प्रकल्प कार्यालय चंद्रपूर येथे देऊनही त्या शिक्षकाला कुठलीही कारवाही न करता त्याची पाठराखण करीत आहे की काय असे चित्र दिसत आहे. शिक्षकावर पॉस्को अंतर्गत गुन्हे दाखल करून सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी आज बिरसा क्रांती दल राजुरा च्या वतीने मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व आदिवासी विकास मंत्री ह्यांना तहसीलदार, तहसील कार्यालय राजुरा ह्यांच्या मार्फत निवेदन पाठवून करण्यात आली.मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा संतोष कुळमेथे, अभिलाष परचाके,अरुण कुमरे, आकाश गेडाम, दीपक मडावी,तसेच इतर सामाजिक संघटना ह्यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here