इगतपुरीतील जेएसडब्लू कंपनीत बॉयलर फुटून दुर्घटना

0
599

इगतपुरीतील जेएसडब्लू कंपनीत बॉयलर फुटून दुर्घटना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामगारांची सुयश रुग्णालयात जाऊन विचारपूस केली

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील जेएसडब्लू कंपनीत लागलेल्या भीषण आगीत जखमी झालेल्या कामगारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुयश रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. यावेळी त्यांना शासनाकडून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

इगतपुरीतील जेएसडब्लू कंपनीत बॉयलर फुटून झालेल्या दुर्घटनेत १७ जण जखमी झाले असून या दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटूंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपये तर जखमींवर शासकीय खर्चात सर्व उपचार करण्यात येतील असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना स्पष्ट केले. तसेच या घटनेमागील कारणे जाणून घेण्यासाठी या आगीची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

यावेळी राज्याचे बंदरे आणि खनिकर्म मंत्री तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, नाशिकचे जिल्हाधिकारी डी. गंगाधरन आणि नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शहाजी उमप, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नगरसेवक अजय बोरस्ते हेदेखील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here