महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा घुग्घूसच्या अध्यक्षपदी सुरेश खडसे यांची नियुक्ती
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुबंई रजि. न. महा. 9819/सां.चे विदर्भ प्रमुख महेश पानसे यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुनिल बोकडे यांच्या सूचनेनुसार
घुग्घूस येथील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत सन 2019 ची जुनी कार्यकारणी बरखास्त करून नवीन कार्यकारणी घोषित करण्यात आली. यावेळी उपस्थित पत्रकारांमधून सुरेश पी. खडसे यांची घुग्घूस शाखा अध्यक्ष पदावर सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली तर उपाध्यक्ष म्हणून संजय जीवनकर, सचिव -प्रणयकुमार बंडी, कार्याध्यक्ष -इम्तियाज रज्जाक , सहसचिव -सुनिल म्हस्के , संघटक -प्रशांत चरडे, कोषाध्यक्ष -पंकज रामटेके तर सहसंघटक म्हणून संदीप चांभारे यांची नियुक्ती करण्यात आली. या नवीन कार्यकारणी बद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे विदर्भ प्रमुख महेश पानसे, जिल्हाध्यक्ष सुनिल बोकडे, कार्याध्यक्ष जितेंद्र चोरडिया, चंद्रपूर जिल्हा सरचिटणीस राजु कुकडे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे तालुका पदाधिकारी व सदस्य यांनी अभिनंदन केले.