चंद्रपूर दिक्षाभुमीच्या विकासाची घोषणा होताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या पदाधिका-र्यांनी भेट घेत मानले आमदार किशोर जोरगेवार यांचे आभार
आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणी नंतर मुख्यमंत्री यांनी केली होती घोषणा
चंद्रपूरच्या पवित्र दिक्षाभुमीचा विकास करण्याच्या आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणीची दखल घेत येथील दिक्षाभुमीच्या विकासाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात केली. त्यांच्या या घोषणेनंतर डॉ. बाबा साहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या पदाधिका-र्यांनी कार्यालयात आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेत पुष्पगुच्छ देत आभार मानले आहे.
यावेळी डॉ. बाबा साहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे उपाध्यक्ष अशोक घोटेकर, सहसचिव कुणाल घोटेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश दहेगावकर, उप प्राचार्य संजय बेले, प्रा. मनोज सोनटक्के यांच्यासह इतर पदाधिका-र्यांची उपस्थिती होती.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्म दिक्षा दिलेल्या चंद्रपूर येथील दिक्षाभुमीचा सर्वसमावेशक विकास करण्यात यावा अशी आमदार किशोर जोरगेवार यांची जुनी मागणी आहे. या मागणीचा त्यांच्या वतीने सातत्याने पाठपूरावा सुरु आहे. प्रत्येक अधिवेशनात आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर विषय सभागृहात मांडला आहे. अखेर त्यांच्या या पाठपूराव्याला यश आले आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर मागणीची योग्य दखल घेत. चंद्रपूरच्या दिक्षाभुमीचा विकास व्हावा यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे प्रयत्न सुरु असल्याचे म्हणत. या दिक्षाभुमीचा विकास करत येथे सर्व सोयी सुविधा पूरविण्यात येईल अशी घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री यांनी सदर घोषणा करताच विविध सामाजिक संस्थांच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांचे आभार मानल्या जात आहे. दरम्यान आज शनिवारी डॉ. बाबा साहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या पदाधिका-र्यांनी आ. जोरगेवार यांच्या कार्यालयात येत त्यांची भेट घेत पूष्पगुच्छ देत त्यांचे आभार मानले आहे. यावेळी सदर सोसायटीच्या पदाधिका-र्यांसह आमदार किशोर जोरगेवार यांची येथील विकास कामांबाबत चर्चा झाली आहे. या अगोदर सदर विकास कामासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी डॉ. बाबा साहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या पदाधिका-र्यांची मुंबई येथे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह भेट करुन दिली होती. त्यानंतर त्यांच्या वतीने सदर मागणी संदर्भात संबंधित विभागाच्या मंत्र्यांसोबत पाठपूरावा केल्या जात होता. मात्र आता मुख्यमंत्री यांनी दखल घेत दिक्षाभुमीच्या विकासाची घोषणा केली आहे. सदर दिक्षाभुमीचा मागील अनेक वर्षापासून विकास झालेला नाही. मात्र आमदार किशोर जोरगेवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे येथील विकासाच्या हालचारी सुरु झाल्या असल्याचे डॉ. बाबा साहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या पदाधिका-यांनी म्हटले आहे.