परतीच्या पावसाने झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून मोबदला द्या – आ. किशोर जोरगेवार यांच्या जिल्हाधिकारी यांना सूचना
चंद्रपूर । मागील काही दिवसांपासून येत असलेल्या परतीच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतीची तात्काळ पाहणी करून पंचनामे करत मोबदला देण्यात यावा अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे याना दिल्यात
आज सोमवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सदर विषयावर सविस्तर चर्चा केली यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक कलाकार मल्लारप, राशीद हुसेन आदींची उपस्थिती होती.
विदर्भात मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाचा फटका चंद्रपूर जिल्हातील शेतकऱ्यांनाही बसला आहे. अनेक भागात अतिवृष्टी झाल्याने शेतकर्यांच्या हाताशी आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून कापूस सोयाबीन भिजल्याने कापूस उत्पादक, धान उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. या पावसाने फळबागा, भाजीपाला यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. या हंगामात सुरुवातीस पावसाचा लपंडाव त्यानंतर आलेली अतिवृष्टी आणि रोगांच्या साथी, किडींचा प्रादुर्भाव यामुळे शेतकऱ्यांची शेती आधिच बाधीत झाली असतांना परतीच्या पावसाने उरल्या सुरल्या पिकांचेही नुकसान केले आहे. उधारवाडी व कर्ज कडून फुलवलेली शेती डोळ्यासमोर उध्वस्त झाल्याने शेतकरी चिंतीत झाला आहे. त्यामुळे त्याला मदतीचे गरज असून शासनाने नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून मदतीसाठी तात्काळ पंचनामे करावे अशा सूचना यावेळी आ. जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांना दिल्या आहे.