आणि कामगार झाले लखपती – सुरज ठाकरे यांच्या प्रयत्नांना यश
गेल्या दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून जय भवानी कामगार संघटनेच्या माध्यमातून गोंड पिंपरी नगरपंचायत अंतर्गत येत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांचा मुद्दा न्यायालयीन लढा व प्रशासकीय लढा हा वेळोवेळी गाजत झाला आहे मग यामध्ये उपोषणाद्वारे लक्ष वेधणे असो की आत्मदहनाचा नगरपंचायत कार्यालयामध्ये केलेला प्रयत्न असो वेगवेगळ्या कारणांनी सुरज ठाकरे आणि त्यांची संघटना मोठ्या संघटनेचे कामगार सदैव जिल्हाभर चर्चेचा विषय बनले आहे.
शासकीय किमान वेतनानुसार वेतन न मिळाल्याचा आरोप करत आधी निवेदन त्यानंतर उपोषण असे वेगवेगळे मार्ग पत्करत शेवटी न्यायालयीन लढा सुरज ठाकरे यांनी कामगारांच्या बाजूने सुरू केला लघु श्रेणी न्यायालयाचेच ताकद ही स्थानिक कामगार आयुक्तांच्या कार्यालयाला दिलेली असल्याने गोड पिंपरी नगरपंचायत येथे काम करत असलेल्या कामगारांना वेतनाची पावती शासनाद्वारे देण्यात येणाऱ्या सेफ्टी सुविधा तसेच किमान रोजीचे पालन होत नसल्याचा आरोप करीत सूरज ठाकरे यांच्या जय भवानी कामगार संघटनेने दावा दाखल केला एक वर्षापेक्षा जास्त कालावधी या दाव्याच्या निकाल लागण्याकरिता लागला आणि अखेरीस निकाल हा सुरज ठाकरे व कामगारांच्या बाजूने लागला सहा महिन्याच्या वेतन कालावधी करिता हा धावा सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रपूर यांच्याकडे करण्यात आला होता दाव्यामध्ये मूळ वेतन फरकाची रक्कम ही एकंदर पंचवीस कामगारांनी करिता १४,७५,२५० लक्ष एवढी होती त्यावर नुकसान भरपाई म्हणून कामगारांनी व सूरज ठाकरे यांनी दहा पट रकमेची मागणी म्हणजेच ४४,२५,७५० लक्ष. केली होती दोन्ही बाजूंचे साक्ष पुरावे तपासल्यानंतर सहायक कामगार आयुक्त यांनी मूळ ध्येय रकमेच्या दुप्पट रक्कम म्हणजेच २९,५०,५०० लक्ष मंजूर केले व तसा आदेश काढण्यात आला आहे या आदेशानुसार तीस दिवसांच्या आत मध्ये सदर रक्कम ही समस्त 25 लाभार्थी कामगारांना आदेशामध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक कामगाराच्या वाट्याला येणाऱ्या रकमेप्रमाणे बँक खात्यामध्ये देण्याचे प्रावधान दिलेले आहे यामुळे खूप मोठे यश परत एकदा सुरज ठाकरे यांच्या पदरी पडले आहे.
कामगारांच्या बाजूने खूप मोठ्या लढाया नंतर आलेला हा निकाल हा कामगारांना सुखावणारा व चंद्रपूर जिल्ह्यातील इतर कामगारांना प्रेरणा देणारा असल्याचे सुरज ठाकरे यांनी यावेळी सांगितले तसेच ही रक्कम फक्त सहा महिन्याच्या वेतन फरकासंदर्भात मिळत आहे अजून साडेपाच वर्षांची रक्कम मिळणे बाकी आहे व त्याकरिता लवकरच वेगळा दावा सुरज ठाकरे यांच्या जय भवानी कामगार संघटनेच्या माध्यमातून केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सुरज ठाकरे यांना मिळालेला या यशामुळे त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.