पोलिसांच्या सक्रिय सहभागातून सोनूर्ली येथे सुरू होणार क्लब, गावकऱ्यांचा विरोध
राजुरा – हिवाळ्याचे दिवस सुरू होताच ग्रामीण भागात जुगार अड्डे,कोंबडा बाजार, इत्यादी गोष्टींना उत येतो. परंतु ह्या मनोरंजनाच्या नावाखाली चालणाऱ्या उद्योगांमुळे ग्रामीण भागात मात्र नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.राजुरा शहरात मनोरंजन केंद्राच्या नावाखाली सुरू असलेल्या क्लब मध्ये अनेक अवैद्य व्यवसाय व अनैतिक गोष्टीचा बोलबाला असल्याची बाब उघड झाल्यानंतर ह्या जुगार चालकांनी सुरक्षित व्यवसाय चालविण्याकरिता व विशेष करून प्रसिद्धी माध्यमांची नजर चुकवण्यासाठी अतिदुर्गम भागातील ग्रामीण क्षेत्राची निवड केल्याचे मागील काही दिवसांपूर्वी समोर आले होते. राजुरा तालुक्यातील विरुर येथे काही महिन्यांपूर्वी मनोरंजन केंद्राच्या नावाखाल सूरु असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकण्यास गेलेल्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकार्यावरचं ह्या जुगार खेळणार्यांनी व ते केंद्र चालविणाऱ्या संचालकांनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याची बाब उघडकीस आली होती. त्यानंतर तालुक्यात अनेक ठिकाणी अतिदुर्गम भागात जिथे संपर्काची साधने उपलब्ध नाही अशा ठिकाणी मनोरंजन केंद्र चालवण्याची परवानगी मागण्यात आली होती. परंतु गावकऱ्यांच्या विरोधामुळे हे प्रस्ताव बारगळला, त्यातच तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या सोनूर्ली येथे मनोरंजन केंद्र चालू करण्याकरिता परवानगी मागण्यात आल्याची खबर असून ह्याबाबत पोलीस विभागाकडे ना हरकत प्रमाणपत्र मागण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे. विशेष म्हणजे हे मनोरंजन केंद्र चालू करण्यात तालुक्यातील अवैद्य दारूचा विक्रेता असणारा एक व्यक्ती व राजुरा शहरातील एक प्रतिष्ठित व्यक्ती सहभागी असल्याची चर्चा आहे. ह्या बाबतची माहिती मिळताच सोनूल येथील गावकन्यांनी ह्याला कडाडून विरोध केला असून हा भाग अतिदुर्गम व शेती बहुल आहे. येथील बहुतांश नागरिक शेती व मजदूरी करून आपले जीवन जगतात. त्यामुले या प्रकारचे केंद्र चालू करून गावातील शांत वातावरण बिघडवू नये व कायदा व्यवस्था बिघडवू नये अशी गावकर्यांची मागणी आहे. त्यामुळे आता ह्या मनोरंजन केंद्राबाबत पोलीस काय भूमिका घेतात ह्याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
हिवाळ्याचे दिवस सुरू होताच ग्रामीण भागात जुगार अड्डे, कोंबडा बाजार, इत्यादी गोष्टींना उत येतो. परंतु ह्या मनोरंजनाच्या नावाखाली चालणाऱ्या उद्योगांमुळे ग्रामीण भागात मात्र नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.