राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने रस्तारोको आंदोलन 

0
614

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने रस्तारोको आंदोलन 

 

चंद्रपुर :- नागपूर हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारी घटना सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकार कडून घडली. महाराष्ट्राच्या राजकारणात मा जयंत पाटील साहेब हे सुसंस्कृत, अभ्यासू, सयंमी, नेते म्हणून ओळखल्या जातात.

सत्ताधारी पक्ष सत्तेत असून सुद्धा विधानसभेत आंदोलन करतात त्यामुळे पाच वेळा विधानसभा तहकूब केल्या जाते ह्या विरोधात जयंत पाटील साहेब ह्यांनी आवाज उठवला, परन्तु द्वेषापोटी शिंदे फडणवीस सरकारने जयंत पाटील साहेब ह्यांच्या वर निलंबनाची कार्यवाही केली.

ह्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर व जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड़ ह्यांच्या नेतृत्वात चंद्रपूर येथील जनता महाविद्यालय चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

रास्ता रोको आंदोलन वेळी राज्य सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या व जयंत पाटील साहेब ह्यांच्या वर केलेली निलंबनाची कार्यवाही त्वरित रद्द करण्यात यावी ही मागणी देखील केली.

आंदोलन करते वेळी विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, ओ बी सी जिल्हाध्यक्ष आरिकर साहेब, महिला अध्यक्ष शालिनी महाकुलकर, महिला कार्याध्यक्ष चारुशीला बारसागडे, महासचिव संभाजी खेवले, युवक अध्यक्ष अभिनव देशपांडे, माजी युवक जिल्हाध्यक्ष फय्याज शेख, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष सुजीत उपरे, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष विनोद लभाने, आकाश निरठवार, कोमिल मड़ावी, राजुरा तालुकाध्यक्ष संतोष देरकर, पंचायत समिति सदस्य पंकज ढेंगारे, माजी सरपंच अमोल ठाकरे, युवती अध्यक्ष अश्विनी तालापल्लीवार, प्रीति लभाने, शुभांगी बहादुरे, नम्रता रायपुरे, राहुल देवतळे, निसार शेख, रोशन फुलझेले, राजुरा शहराध्यक्ष रकीब शेख, सुजीत कावळे, गणेश बावने, नितिन घुबड़े, रोशन कोमरेद्दिवार, कुमार पौल, अमित गावंडे, संजय सेजुल, तिमोति बंडावर, निशांत वाकडे, राहुल भगत, संदीप बिसेन, राहुल वाघ,अक्षय कोवले आसिफ शेख, केतन जोरगेवार, मनोज सोनी, मुन्ना टेमबुरकर, अनुकूल खन्नाडे, अंकित ढेंगारे, नंदू जोगी, सतीश मांडवकर, सचिन माण्डाळे, प्रफुल कुचनकर, मानव वाघमारे, अरविन्द लोधी, संजय बिस्वास, सुधीर पोइला, राज शेट्टी, भोजराज शर्मा, निशांत वाकडे, विक्की रायपुरे, मंजू जामगड़े, संजय रामटेके, अमर तिवारी, नंदू मोंढे, राजू रेड्डी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य पदाधिकारी व कार्यकते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here