चंद्रपूर विधानसभा मतदार संघातील मान्यताप्राप्त विकासकामांना जनसुविधा योजनेत समाविष्ठ करून कार्यारंभ करा
यंग चांदा ब्रिगेडची, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मागणी…
चंद्रपूर विधानसभा मतदार संघातील मुख्यमंत्री यांनी मान्यता दिलेल्या प्रशासकीय मान्यताप्राप्त विकासकामांना जनसुविधा योजना सन २०२१-२२ अंतर्गत समाविष्ठ करून कार्यारंभ करण्यात यावे अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या ग्रामीण विभागाच्या वतीने केली असुन सदर मागणीचे निवेदन त्यांच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकरी अधिकारी विवेक जाँन्सन यांना दिले आहे.
यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष राकेश पिंपळकर, दाताळा ग्रा. पंचायातचे माजी सरपंच रविंद्र लोणगाडगे, साखरवाही सरपंच नीरज बोंडे, म्हातारदेवी च्या सरपंच संध्या पाटील, कोसारा सरपंच ऋतिका नरुले छोटा नागपूरचे उपसरपंच रिषभ दुपारे, मोरवा उपसरपंच भुषण पिदुरकर आदींची उपस्थिती होती.
चंद्रपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार किशोर जोरगेवार यांनी शासनाच्या माध्यमातून विकासकामे करण्याच्या दृष्टीने जनसुविधा योजना सन २०२१- २२ अंतर्गत विकास महत्वपूर्ण कामांची शिफारस केली होती. योजनेंअंतर्गत सुचविलेल्या विकासकामांना मंजुरीही प्रदान करण्यात आली होती. परंतु राज्य शासन बदलल्याने सदर कामांवर स्थगिती देण्यात आली. त्यानंतर स्थगीती हटविण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. याची दखल घेत विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रपूचे जिल्हाधिकारी यांना आदेशित करून या कामांवरील स्थगिती उठविण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. असे असतांनाही सदर कामावरील स्थगीती हटविण्यात आलेली नाही. त्यामुळे चंद्रपूर मतदार संघातील ग्रामीण क्षेत्रातील पायाभूत विकासकामे रखडलेली आहे.
ही बाब लक्षात घेता तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशाचे पालन करत चंद्रपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सुचविलेल्या जनसुविधा योजना सन २०२१-२२ अंतर्गत विकासकामांना मंजुरी व निधी वितरीत करण्याकरिता संबंधिताना तात्काळ आदेश द्यावे अशी मागणी यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने निवेदनाच्या माध्यमातुन केली आहे.