ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार युथ चषक तिन दिवसीय कबड्डी सामन्यात महाकाली क्रिडा मंडळ यांना प्रथम पारितोषिक !

0
617

ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार युथ चषक तिन दिवसीय कबड्डी सामन्यात महाकाली क्रिडा मंडळ यांना प्रथम पारितोषिक !

व्हिडीओ कॉलिंग द्वारे ना. मुनगंटीवार यांनी सहभागी खेळाडूंना दिल्या शुभेच्छा !

चंद्रपूर (का.प्रति.) : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडा मंडळाद्वारे नाम. सुधीरभाऊ मुनगंटीवार युथ चषक शुक्रवार दि. १६ ते १८ डिसेंबरपर्यंत ३ दिवसीय कबड्डी सामन्यांचे आयोजन इंदिरानगर येथे करण्यात आले होते. यामध्ये ५६ किलो वजन गटाच्या ५२ क्रीडा मंडळांनी सहभाग घेतला असून अमर्यादित ओपन २६ क्रीडा मंडळाने सहभाग घेतला. नाम. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या विकास कामाला प्रेरित होऊन नाम. सुधीरभाऊ मुनगंटीवार युथ चषक मनोज पोतराजे मित्र परिवारातर्फे आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन भाजप जिल्हाध्यक्ष तथा माजी जि.प. अध्यक्ष मान. देवरावदादा भोंगळे व उपमहापौर राहुल भाऊ पावडे यांच्या हस्ते करण्यात आले होते. रविवार दि. १८ डिसेंबर रोजी या तिन दिवसीय युथ चषक सामन्यांचा समारोप झाला. यावेळी व्हिडीओ कॉलिंग द्वारे नाम. सुधीरभाऊ यांनी संबोधित करतांना मनोज पोतराजे मित्र परिवाराने आपल्या नावाने या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्यामुळे त्यांचे आभार मानले. या स्पर्धेत सहभागी खेळाडूंनी भविष्यात मोठे यश लाभो, अशा सदिच्छा दिल्या. क्रिडा क्षेत्रात चंद्रपूर जिल्ह्याचे नांव संपूर्ण भारतात व्हावे यासाठी नाम. सुधीरभाऊ मुनगंटीवार हे नेहमी प्रयत्नशिल असतात. चंद्रपूर जिल्ह्यात अनेक तालुक्यात त्यांनी क्रिडा संकुले उभी केली असून त्यातुन जागतिक दर्जाचे क्रिडा पटू तयार व्हावे, हा त्यांचा नेहमी प्रयत्न राहिला आहे. यापूर्वी मान. श्री नाम.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतील जिवती सारख्या अति दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी माऊंट एव्हरेस्ट पर्वत पार करून चंद्रपूर जिल्ह्याचे नाव संपूर्ण देशात मोठे फक्त.. सुधीर भाऊ मुळे शक्य होऊ शकले श्री.नाम.सुधीर मुनगंटीवार युथ चषक अ गटातील प्रथम पारितोषिक महाकाली क्रीडा मंडळाने पटकाविले. तर द्वितीय पारितोषिक वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडा मंडळ चंद्रपूर तृतीय पारितोषिक विद्यार्थी क्रीडा मंडळ भद्रावती यांनी प्राप्त केले. 56 वजन गटातील प्रथम पारितोषिक वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडा मंडळ चंद्रपूरने मिळविले असून द्वितीय पारितोषिक न्यू जगन्नाथ कोंडा यांना मिळाले तर तृतीय पारितोषिक जय भवानी क्रीडा मंडळ बल्लारपूर यांनी पटकाविले. यावेली महानगर संघटन महामंत्री राजेंद्र गांधी, महानगर महामंत्री ब्रिजभूषण पाझारे,महानगर महामंत्री सुभाष कासनगुटवार, महानगर महामंत्री रवि गुरनूले, माजी महापौर अंजलीताई घोटेकर, मंडळ अध्यक्ष दिनकर सोमलकर, माजी नगरसेविका सौ. चंद्रकलाताई सोयाम, सौ. जयश्रीताई जुमडे, सौ. वंदनाताई जांभुळकर, डॉ. दिपक भट्टाचार्य, सचिन कोतपलिवार, सुधाकर राकडे,धम्मप्रकाश भस्मे, गिरीधर येडे, अनिल सुरपाम, विनोद शेरकी, सुनिल डोंगरे, दिनेश कष्टी प्रलय सरकार, चांद सय्यद, रेखा मडावी, वर्षा समोरकर,आशिष ताजणे, संजय पटले, पप्पू बोपचे, आकाश मस्के, नागेश टोंगे, रोहित आत्राम, अनिल गेडाम, संदीप कंडे, यशवंत दूरूटकर, विशाल हिंगे, चेतन जवादे, निखिल धंदरे आदींसह खेळाडू तसेच कबड्डीप्रेमी नागरिकांची याठिकाणी उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here