ओबीसी समाजाच्या आरक्षण संबंधित विविध मागण्यांसाठी इतर मागास बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट
ओबीसी चा बॅक लॉक तातडीने भरण्याबाबत शासन सकारात्मक – विजय वडेट्टीवार
ओबीसी आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करणार विजय वडेट्टीवार यांची माहिती
चंद्रपूर, दि. 11 ऑक्टोंबर : ओबीसीचा बॅकलॉग तातडीने भरण्याबाबत शासन सकारात्मक असून त्यासाठी तातडीने मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आश्वस्त केले असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
ओबीसी आरक्षणाचा विषय मार्गी लावण्यासाठी काल मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत राज्याचे इतर मागास बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांची बैठक झाली. बैठकीनंतर वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली. बैठकीस अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री अनिल परब, जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह मुख्य सचिव सीताराम कुंटे, माजी आमदार प्रकाश शेंडगे आणि ओबीसी समाजाचे, बारा बलुतेदार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांसमवेत ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर सविस्तर चर्चा केल्यानंतर केली. ओबीसी मुलांच्या शिष्यवृत्तीसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, ओबीसी चा बॅकलॉग तातडीने भरण्याबाबत शासन सकारात्मक राहील, त्यासाठी शासनाच्या वतीने एक समीती नेमणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ओबीसी समाजाच्या मागण्यांची आणि प्रश्नांची सरकारला जाणीव असून त्याची पुर्तता करण्यासाठी तसेच त्याचा पाठपुरावा करून ते प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमितीची स्थापन केली जाईल,असे आश्वासन मुख्यमंत्र्यानी दिले आहे. या समितीने ओबीसी समाजाच्या मागण्यांचा साकल्याने विचार करावा व जे निर्णय तत्काळ घेता येतील त्याची प्रक्रिया गतिमान करावी. याच पद्धतीने निधीसाठीही मागणी करतांना प्राधान्याने हाती घ्यावयाची कामे निश्चित करावीत. टप्प्या टप्प्याने ओबीसी समाजाचे प्रश्न आपण नक्की मार्गी लावू असे मुख्यमंत्री म्हणाल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.