राजुरा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत उभारला कांग्रेस चा झेंडा
चार पैकी तीन काँग्रेस तर एक वर भाजपा
विरुत स्टेशन (प्रतिनीधी)
आज जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुक निकालात राजुरा तालुक्यात काँग्रेसने बाजी मारली असून एकूण ४ पैकी ३ ग्रामपंचायतीवर काँग्रेस तर एक ठिकाणी भाजपने झेंडा फडकविला आहे. काँग्रेसचे तालुक्यातील विरूर स्टेशन-अनिल आलाम, डोंगरगाव-इंदिरा मेश्राम आणि हरदोना-सगुणा मेश्राम तर भाजपचे देवाडा-शंकर मडावी हे सरपंचपदी थेट जनतेतून निवडून आले आहेत.
सर्व विजयी सरपंच व सदस्यांचे काँग्रेसच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. सर्व विजयी सरपंच, सदस्यांनी, कार्यकर्त्यांनी आमदार सुभाष धोटे आणि काँग्रेस पक्षाचा जयघोष करीत जल्लोष साजरा केला. या प्रसंगी राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, अभिजित धोटे, आबाजी पाटील ढुमणे, कुंदा जेनेकर, अजय रेड्डी, सुरेश पावडे, धनराज चिंचोलकर, अजय जयस्वाल, विलास आकेवार, अजित सिंग, राजु इग्रपवार, सचिन जयस्वाल, गणेश बारसागडे, ज्ञानेश्वर मोरे, उमेश मोरे, प्रवीण चिडे, सतीश चिटलवार, ज्ञानेश्वर तुराणकर, मनोज नारनवरे, रोशन झाडे, मंगेश पावडे, मंगेश पवार, स्वप्नील मोरे, लुटारू पा. नारनवरे, सुधाकर पेंदोर, बबन ताकसांडे, संजय ढवळे, संभाजी पिंपळशेंडे, सागर ढमके, महादेव भसारकर, अॅड. रामभाऊ देवईकर, रामभाऊ ढुमणे, विकास देवाळकर, शंकर बोंकुर, अब्दुल जमीर, इरशाद शेख, चेतन जयपूरकर यासह काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
देवाडा ग्रामपंचायत वर भाजपाची एकहाती सत्ता….
राजुरा तालुक्यातील देवाडा ग्रामपंचायत वर भारतीय जनता पार्टीने एकहाती सत्ता मिळवल्याबद्दल नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचे राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड.संजय भाऊ धोटे, माजी नप सभापती राधेश्यामजी अडानिया यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या यावेळी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित होते.