आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थिनींना सायकलचे वाटप…
मित्र परिवाराचे आयोजन, 54 गरजु विद्यार्थींना देण्यात आल्या सायकल
आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार किशोर जोरगेवार मित्र परिवाराच्या वतीने जटपूरा गेट येथे गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते 54 गरजु विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी सेवा दलाचे सूर्यकांत खनके, योग नृत्य परिवाराच्या राधिका मुंदडा, महाकाली सेवा समितीचे अध्यक्ष अजय जयस्वाल, माजी नगरसेवक बलराम डोडाणी, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटीका वंदना हातगावकर, जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, माता महाकाली महोत्सव समीतीचे प्रभाकर मंत्री, राशेद हुसेन, सवीता दंडारे, सायली येरणे, अमोल शेंडे, करणसिंह बैस, दुर्गा वैरागडे, आशा देशमुख, भाग्यश्री हांडे, आशु फुलझेले, कल्पना शिंदे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यंग चांदा ब्रिगेड व विविध सामाजिक संघटणांच्या वतीने सदर आयोजन करण्यात आले होते. दरम्याण सायंकाळी 8 वाजता आमदार किशोर जोरगेवार मित्रपरिवाराच्या वतीने जटपुरा गेट येथे गरजु विद्यार्थीनींसाठी सायकल वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी विविध शाळांमधुन विद्यार्थिनींचे नावे मागविण्यात आली होती. त्यानंतर सदर विद्यार्थिनींना या कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सायकलचे वितरण करण्यात आले.
शिक्षण क्षेत्रात भरीव काम करण्याचा संकल्प आपण केला आहे. गरिबीमुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचे शिक्षण सुटता कामा नये, अशी आपली भुमिका आहे. गरीब गरजु परिवारातील युवक युवतींनाही उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी आपले प्रयत्न सुरु आहे. मध्यमवर्गीय विद्यार्थी शिकत असलेल्या शिक्षण संस्थांनाही आपण बळकटी देण्याचे काम करत आहोत. अनेक शाळांना सुसज्ज लॅब, संगणक आपल्याकडून उपलब्ध करुन दिल्या जात आहे. तर महागड्या अभ्यासिकांमध्ये अभ्यास करणे न परवडणा-र्या विद्यार्थांसाठी आपण 13 अभ्यासिका तयार करत आहोत. या अभ्यासिकांमध्ये विद्यार्थांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध असणार असुन येथे निशुल्क अभ्यास करता येणार आहे. माझ्या वाढदिवसानिमीत्त आज दिवसभर अनेक सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यात मी कर्तव्य सेतुचे उद्घाटन केले. हे सेतु केंद्रही अनेकांसाठी लाभदायक ठरणार आहे. तर मित्र परिवार तर्फे आयोजित हा कार्यक्रमही कौतुकास्पद आहे. विद्यार्थिनींना सायकल उपलब्ध झाल्याने आता त्यांना बस किंव्हा आटोचे भाडे देण्याची गरज नसल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. या उपक्रमा बदल त्यांनी मित्र परिवार गृपचे कौतुकही केले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांसह विद्याथ्यींनीच्या पालकांचीही उपस्थिती होती.
माता महाकाली मंदिराचा भाविकांना अपेक्षीत असा विकास करणार – आ. किशोर जोरगेवार
वाढदिवसा निमित्त माता महाकाली मंदिरात महाआरती
माता महाकाली मंदिराच्या सर्व समावेशक विकासासाठी माझे प्रयत्न सुरु आहे. नुकतीच मी पर्यटन व सांस्कृतीक मंत्री यांची दिल्ली येथे भेट घेतली असुन सदर विकासाआड येत असलेल्या पूरातत्व विभागाची अट रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक पडल्यास कायद्यात बदल करण्याचे आश्वासन दिले आहे. या कामासाठी मी प्रयत्नशिल असुन भाविकांना अपेक्षीत असा विकास येथे करणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसा निमित्त माता महाकाली मंदिर येथे महाआरती करण्यात आली. यावेळी माता महाकाली महोत्सव समितीचे अध्यक्ष अजय जैस्वाल, विजय मोगरे, कुक्कु सहानी, मन्ना त्रिवेदी, बलराम डोडाणी, सुरेश महाकुळकर, सूर्यकांत खनके, दादाजी नंदनवार, मधुसूदन रुंगठा, संजय हरणे, प्रा. श्याम धोपटे, पूनम तिवारी, अशोक तुमराम, स्वरूप मिश्रा, शर्माजी, विलास मसराम, प्रा श्याम हेडाऊ, धनंजय दानव, राजू रेड्डी यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी महाआरती नंतर बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, माता महाकाली महोत्सवाच्या माध्यमातून आपण नवी प्रथा सुरु केली आहे. भाविकांच्या मनात असलेली संकल्पना माता महाकाली महोत्सवाच्या माध्यमातुन सुरु झाली असुन ती नियमित सूरु राहणार आहे. कमी दिवसात झालेल्या या भव्य आयोजनाची राज्याने नोंद घेतली आहे. यात लाभलेला सर्व धर्मीय सामाजिक संस्थांचा सहभाग कौतुकास्पद होता. पूढेही त्यांच्या सहभागी लाभेल अशी अपेक्षा यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी बोलुन दाखविली.
माता महाकाली मंदिराच्या विकासासाठी आपण कटिबध्द आहोत. दुस-या आणि तिस-या टप्यातील विकासकामांसाठी आपण निधीची मागणी राज्यसरकारकडे केली आहे. याबाबत राज्य सरकारही सकारात्मक आहे. मात्र या कामात पूरातत्व विभागाची मोठी अडचण येत आहे. हा केंद्राचा विषय असल्याने आपण दिल्ली येथे पर्यटन व सांस्कृतीक मंत्री जि. किशन रेड्डी यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली आहे. संबधित विभागाच्या सचिवांशीही आपण बैठक घेतली असल्याचे ते म्हणाले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते महाकाली मातेची महाआरती करण्यात आली. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.