मृतकाच्या परिवारास ५० लक्ष भरपाई व चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा… – आम आदमी पार्टी

0
636

मृतकाच्या परिवारास ५० लक्ष भरपाई व चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा… – आम आदमी पार्टी

दिनांक 10 डिसेंबर 2022 रोजी सनविजय अलॉईज & पॉवर ली. ताडाळी (442406) कंपनी मध्ये काम करीत असताना कामगाराचा अपघात झाला व मृत पावला. या घटनेवरून असे स्पष्ट होते की ही कंपनी सुरक्षा नियमांचे पालन करत नाही त्यामुळे मजुरांच्या जीवाला हानी होते. सदर अपघाता वरून असे लक्षात येते की कंपनी द्वारा योग्य त्या सुरक्षा नियमांचे पालन केले नसल्यामुळे कामगार वर्गाचा जीव धोक्यात आहे.

या घटनेची दखल घेत आम आदमी पार्टी घुग्घुस ने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना अशी मागणी केली की, मृतकाच्या परिवारास भरपाई म्हणून ५० लक्ष देण्यात यावे व परिवारातील एका सदस्यास एक नौकरी देण्यात यावी. सोबतच कंपनीने सुरक्षा नियमांचे पालन न केल्यामुळे कमीत कमी ०५ कोटी रुपयांचे दंड ठोठावण्यात यावे.जेणेकरून अश्याप्रकारच्या घटना येणाऱ्या काळात कंपनी मध्ये घडणार नाही, सोबतच या कंपनीला विस्तारीकरणासाठी नाहरकत प्रमाणपत्र न देण्यात यावे असेही मागणी आम आदमी पक्षाची आहे.ही मागणी पूर्ण न झाल्यास आम आदमी पार्टी घुग्घुस द्वारा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा घुग्घुस पक्षाध्यक्ष अमित बोरकर यांनी दिला.

निवेदन देताना अध्यक्ष अमित बोरकर यांच्यासह उपाध्यक्ष अभिषेक सपडी, सचिव संदीप पथाडे, सहसचिव विकास खाडे, सह संघटनमंत्री आशिष पाझारे, रवी शांतलावार, प्रशांत सेनानी, प्रफुल पाझारे, निखिल कामतवार, अनुप नळे, करण बिऱ्हाडे, संतोष सलामे, प्रशांत पाझारे, कुलदीप पाटील, महिला शहर अध्यक्ष उमा तोकलवार, महिला उपाध्यक्ष सोनम शेख, महिला सचिव विपश्यना धनविजय, महिला कोषाध्यक्ष अंजली नगराळे, महिला संघटनमंत्री पुनम वर्मा, रिना पेरपूल्ला, शामला तराला, धम्मदिना नायडू, नईमा शेख, कविता विष्णु भक्त, शोभाताई इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here