राजुरा येथे ओबीसी जनगणना विषयावर चर्चासत्र
राजुरा :– राजुरा येथे ओबीसी जनगणना या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्राला प्रमुख वक्ते म्हणून ओबीसी नेते बळीराज धोटे, प्रमुख पाहुणे प्राचार्य दौलतराव भोंगळे, बापूरावजी मडावी, सामाजिक कार्यकर्ते छोटूभाऊ सोमलकर, ओबीसी नेते, अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस तथा कळमनाचे सरपंच नंदकिशोर वाढई, मराठा सेवा संघ राजुराचे अध्यक्ष दिनेश पारखी, उमेश वाढई यांची विचारपीठावर उपस्थिती होती.
ओबीसी नेते बळीराज धोटे यांनी ओबीसी ची जात निहाय जनगणना का झाली पाहिजे, यासाठी ओबीसीची मोठी चळवळ उभी राहिली पाहिजे, ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात ओबीसी बांधवांनी आपला न्याय हक्कासाठी जनजागरण केले पाहिजे, ओबीसी समाजाने नुसतं कर्मकांडांमध्येच न राहता शिक्षणाची कास धरून अभ्यासपूर्व जीवन जगलं पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या भावी पिढीला त्यांच्या न्याय्य हक्कासाठी कोणापुढे हात पसरावा लागणार नाही असे विचार व्यक्त केले. नंदकिशोर वाढई यांनी ओबीसीची जातनिहाय जनगणना आवश्यक आहे, नुकतेच आयोगाने ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवलेले आहे. आपण असेच शांत बसल्यास आपले हक्क हिरावून घेतले जातील म्हणून ओबीसी बांधवांनी सजग राहून ओबीसी चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. तेव्हाच ओबीसींना शैक्षणिक, सामाजिक व राजकीय आरक्षणासह सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध होतील असे मत प्रास्ताविकातून व्यक्त केले.
या प्रसंगी ओबीसी चळवळीचे कार्यकर्ते पुंडलिक वाढई, विजय मोरे, रमेश रासेकर, कृष्णाजी भोयर, पाकमोडे सर, बाबुराव मुसळे, मारुती सातपुते, बोंडे सर, राजु पिंपळशेंडे, मधुकर लडके, संदीप आदे, विनोद कावळे, मधुकर मटाले, गजेंद्र ढवस, उमेश वाढई, संदीप निरांजने, आनंदराव धोटे, रामकिसन पारखी, रवी कुरवटकर, राजजीवन वाघमारे, मनोज कुरवटकर, मनोहर माडेकर, नवनाथ डेरकर, दिनेश उरकुडे, नामदेव मोहूर्ले, राजेंद्र गौरकर, भास्कर सपाट, पुंडलिक उरकुडे, स्वप्निल मोहूर्ले, विजय उपरे, दिनकर आवारी, सुरज भामरे, अर्जुन अलगमकर, लक्ष्मण घुगुल, संभाजी साळवे, मोहनदास मेश्राम, जयपाल वांढरे, नितेश चांदेकर, शाहीर हुसेन, शेख रफिक, वामन खंडाळकर, सुमनताई बोबडे, सरिता डाखरे, वर्षा कानकाटे यासह ओबीसी चळवळीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दिनेश पारखी यांनी केले.