राष्ट्रीय एकतेचे प्रतीक सरदार पटेल यांना काँग्रेस तर्फे आदरांजली अर्पित

0
855

राष्ट्रीय एकतेचे प्रतीक सरदार पटेल यांना काँग्रेस तर्फे आदरांजली अर्पित

घुग्घूस : देशाचे पहिले गृहमंत्री मंत्री तथा उप -पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथी निमित्त शहर काँग्रेस कार्यलयात शहर अध्यक्ष राजूरेड्डी व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून आदरांजली अर्पित करण्यात आली.

सरदार पटेल यांनी जवळपास 562 ते 565 छोटी मोठी अर्धस्वायत्त संस्थानाचे भारतात विलीनीकरण करून भारतीय एकता निर्माण केली होती. संपूर्ण जगात एक ही व्यक्ती इतक्या मोठ्या संख्येने राज्याचे एकीकरणाचे साहस करू शकले नाही. त्यांच्या कार्याची दखल घेवून भारतीय महिलांनी त्यांना “सरदार” ही उपमा दिली. 15 डिसेंबर 1950 रोजी त्यांचे निधन झाले आज त्यांची पुण्यतिथी देशभरात साजरी करण्यात येत आहे.

याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, रोशन दंतलवार,रोहित डाकूर, बालकिशन कुळसंगे,शाहरुख शेख,सुनील पाटील,कपिल गोगला,अंकुश सपाटे,व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here