विरूर ग्रामपंचायत निवडणुकीत प्रथमच 62 जण रिंगणात

0
667

विरूर ग्रामपंचायत निवडणुकीत प्रथमच 62 जण रिंगणात

18 डिसेंबरला थेट लोकांमधुन होणार सरपंचाची निवड

 

 

अविनाश रामटेके
विरुर स्टेशन (प्रतिनिधी)

राजुरा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या विरुर स्टेशनचा थेट सरपंचपदासह निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच येथिल प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्याच्या मदत घेत आजी- माजी सदस्यासोबत उमेदवारांची रेलचेल सुरू झाली व आपणच निवडुन येईल अशी स्वप्ने उराशी बाडगून 62 जणांनी आपला उमेदवारी अर्ज भरल्याने प्रथमच इतक्या मोट्या संख्येत असल्याने मतदारात उत्सुकता निर्माण झाली आहे.

11 सदस्यसंख्या असलेल्या विरूर ग्रामपंचायतीत एकूण 4 वॉर्डांचा समावेश आहे. विरुर हे पेसा गाव योजनेत असल्याने सरपंच पद हे अनुसूचित जमाती सर्वसाधारण करिता आरक्षित आहे त्यामुळे सरपंच पदाकरिता एकूण 8 उमेदवारी अर्ज भरण्यात आले.

तालुक्यात लोकसंख्येत मोठी व आर्थिकदृष्‍ट्या मजबुत ग्रामपंचायत पण विकासकामत शून्य व गावाचा वाढता विस्तार पाहता अनेक समस्यातून विरूर आजही मुक्त झालेले नाही अशा या ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. म्हणून ग्रामपंचायत आपल्या ताब्यात असावी या दृष्टीने मोर्चेबांधणी करीत मतदारांचा कल आपल्या कडे वडविताना स्थानिक विविध पक्षाचे नेते करीत असताना दिसत आहे.

आगामी निवडणूकी साठी वार्ड रचनेत फेरबदल झाले असल्याने अनेकांना आनंद तर काहींना अडचणी निर्माण झाल्या आहेत तरी अडचणींना मात करीत व पक्षात बंडखोरीचा आघात सहन करीत स्थानिक पक्षाच्या नेत्यांनी उमेदवाऱ्याची फळी उभी केली असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष वेधले जात आहे.

मागील काळात विरुर ग्रामपंचायत वर कांग्रेस नी आपला सरपंच दिला मात्र त्यांना बहुमत मिडवता आले नाही म्हणून यावेळी सत्ता मिळविण्यासाठी भाजपा व शेतकरी संघटना आपली सर्व शक्ती पणाला लावून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे त्याच प्रमाणे नव्याने संघटन करून शिवसेना ,,वंचित बहुजन आघाडी व काही अपक्ष संघटना नि आपली कंबर कसून मैदानात उतरल्याने गावातील राजकारणाचे समीकरण बद्दल्याचे दिसून येत आहे तर काँग्रेस ला आपला विजयरथ कायम ठेवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे.

8 तारखेपासून उमेदवार सोशल मीडिया चा वापर करीत प्रचाराला सुरुवात केली असून उमेदवाराला गावतलील अनेक समस्येचे गाऱ्हाणे मतदारकडून ऐकावे लागणार आहे तेव्हा विविध पक्षाकडून आश्वासनाचा पाऊस पडणार आहे मात्र यावेळी विकासकामांच्या मुद्यावर मतदान करू असे मतदारांत बोलल्या जात आहे. मात्र येत्या 19 डिसेंबरलाच कडेल कोणत्या पक्षाच्या गळ्यात विजयाची माळ पडेल तेव्हा याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here