वेकोलीच्या सेफ्टी बोर्ड मेंबर स्तरावर प्रमोद अर्जुनकर यांची नियुक्ती
घुग्घूस : लाल झेंडा कोल माईन्स मजदूर युनियन (सिटू )चे दहावे केंद्रीय सम्मेलन नुकतेच पार पडले. या केंद्रीय अधिवेशनात पदाधिकारी व कार्यकारी सदस्य मिळून 61लोकांची केंद्रीय कमेटी गठीत करण्यात आली होती.तर नवीन कार्यकारणी वर्किंग कमेटीची सभा नागपूर येथे सिटू युनियनच्या कार्यालयात सपन्न झाली. या सभेत प्रमोद अर्जुनकर यांची वेकोलीच्या सेफ्टी बोर्ड मेंबर स्तरावर सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे.या नियुक्ती बद्दल राष्ट्रीय सचिव व मध्यप्रदेश महासचिव प्रमोद प्रधान, महाराष्ट्र प्रदेश महासचिव एस. ए. शेख,महाराष्ट्र उपाध्यक्ष शहीद अहमद, कोल फेडरेशन महासचिव तथा जेबीसीसीआय मेंबर डी. डी. रामानंदन, वैकल्पिक जेबिसिसिआय मेंबर एस. एच बेग,अध्यक्ष (सिटू )जगदीश दिवरसे, व लाल झेंडा कोल माईन्स मजदूर युनियन चे महासचिव जी.रामन्ना यांनी वेकोली कामगाराच्या समस्या सोडविण्या साठी व पुढील वाटचाल योग्यरित्या पार पाडण्यासाठी वर्धा व्हाली संयुक्त महासचिव प्रमोद अर्जुनकर यांना शुभेच्छा दिल्या आहे.