कारला येथे काँक्रेट रोड व नालीचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम

0
576

कारला येथे काँक्रेट रोड व नालीचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम

प्रतिनिधी देवेंद्र भोंडे

चांदूर रेल्वे (कारला) । शासनाच्या निधीतून चांदूर रेल्वे तालुक्यातील कारला ग्रामपंचायत येथे रोड व नाली चे बांधकाम काही दिवसा अगोदर करण्यात आले होते. कोरोनामुळे निधी परत जाण्याचा भितीने थातुर-मातुर निकृष्ट दर्जाचे रोड व नालीचे बांधकाम करण्यात आले आहे.
यावरून PWD मार्फत गावात केलेले नाली व रस्त्याचे बांधकामाला अधिकाऱ्यांचे गालबोट लागल्याचे दिसून येते. एखादे बांधकाम म्हटले की, अधिकारी आणि पदाधिकारी यांची टक्केवारी ठरलेली असते. त्यामुळे तक्रार करावी कोणाकडे आणि केली तरी त्याचे निराकरण होत नाही. निधी परत जाऊ नये. तसेच कामे केली नाही तर कमाई आणि कमीशन मिळणार नाही या नादात नाली बांधकामाचा सपाटा लावण्यात आला.
याची चौकशी केल्यास पितळ उघडं पडेल व अधिक मलिंदा लाटण्याच्या नादात विकासाच्या नावाखाली बोगस कामे करण्यात आली आहे. तरी सदर कामाची चौकशी करुन दोषीवर कारवाई करावी अशी मांगणी जनतेतुन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here