विरूरात संविधान दिन उत्साहात साजरा

0
649

विरूरात संविधान दिन उत्साहात साजरा

 

विरुर स्टेशन : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल इन वन युथ फोरम विरुर च्या सदस्यांनी 26 नोव्हेंबर संविधान दिनाचे औचित्य साधून संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय प्राप्त करून देण्याचा आणि व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार संविधान प्रस्ताविक चे सामुहिक वाचन करून उपस्थित सदस्यांनी कडून यावेळी करण्यात आला.
व 26 – 11 च्या दहशतवादी भ्याड हल्ल्यात झालेल्या शहीद जवानांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.

आयोजित कार्यक्रमात प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहिद भगतसिंग, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची पूजा अर्चना करून मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. यावेळी भीमराव पाला तंटा मुक्त अध्यक्ष विरुर, शाहू नारनवरे जेष्ठ पत्रकार, भास्कर सिडाम माजी सरपंच विरुर, अविनाश रामटेके, तुषार मोरे, सुरेश पावडे, रवींद्र तकसंडे हे प्रामुख्याने उपस्थित होते.

उल्लेखनीय आहे की प्रथमच युथ फोरम च्या सदस्यांनी छत्रपती शिवाजी चौकात संविधान दिवस साजरा करण्यात आला त्यामुळे उपस्थित युवकांत एक मोठा उत्साह दिसून येत होता , सविधानाच्या प्रास्तविकेच्या वाचन करताना लोकशाही गणराज्य घडविण्याचा व राष्ट्रीय एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा निर्धार उपस्थित युवकां कडून करण्यात आला.

कार्यक्रम चे प्रास्ताविक व संचालन सचिन पिपरे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्या करिता अमन पावडे, मोरेश्वर कडुकर, प्रज्वल येरोजवर, हितेश गाडगे, जानी ताळे, सुरज भोसकर, भोसकर, तुषार मोरे, योगेश बक्षी, अमोल उराडे, अंगद लांडे, संतोष श्रीकोंडावर, यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here