चिमूर क्रांती सांस्कृतिक लोककला मंडळ चिमूरच्या वतीने मा सांस्कृतिक मंत्रालय मुबई यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन

0
518

चिमूर क्रांती सांस्कृतिक लोककला मंडळ चिमूरच्या वतीने मा सांस्कृतिक मंत्रालय मुबई यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन

चिमूर । विकास खोब्रागडे

पळसगांव (पिपर्डा) देशात सर्वत्र कोरोना महामारीने कहर केला असून देशाला हादरा दिला अशातच शासन आणि प्रशासनाने वेळीच जागृकता दाखवून वेळोवेळी लाकडाऊन करून जनतेला सतर्क रहा व घरीच रहा असा इशारा दिला व कोरोना या विषाणूजन्य रोगाची जनसामान्य माणसात जनजागृती केली परन्तु ग्रामीण भागातील लोक कलावंताचे कार्यक्रम उदा नाट्य, खडीगमत, कलापथक, पथनाट्य, कीर्तन, भजन, भारुड, हरिपाठ, गोधड, डहाका, दडांर असे अनेक समाज प्रबोधनपर कार्यक्रम कोरोनाच्या महामारीत बंद करण्यात आले त्यामुळे अनेक लोककलावंताला व त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला आपल्या उदरनिर्वाहाचे प्रश्न डोळ्या समोर उभे आहे. तर अनेक महिन्यापासून काही कलावंताचे मानधन सुद्धा थकीत असल्याने तर काही लोक कलावंताच्या फाईली प.स. कार्यालयात पेंडीग पडल्या असून या सर्व कलावंतावर उपासमारीची पाळी आली आहे. सर्व समस्याचे निवेदन ग्रामीण लोककलावंताच्या मार्फत मा सांस्कृतिक मंत्रालय मुबई यांना उपविभागीय अधिकारी याना देण्यात आले.
निवेदन देत असताना शंकर प्रल्हाद रामटेके अध्यक्ष कोटगाव, हरीचंद्र परसराम सोरदे उपाध्यक्ष नवेगाव पेठ, रतीराम शंकर डेकाटे सचिव कोलारा, श्रीकृष्ण जानबा नन्नावरे सहसचिव एकनाथ तुळशीराम बोरकर कोषाध्यक्ष पंढरी शामराव धोंगडे, केशव डोमाजी वरखेडे, शंकर उरकुडा सोनवाणे, दामोदर श्रीहरी बोरकर, सुखदेव गंगाराम धारने , पुडलीक तुळशीराम राणे, रत्नमाला नानाजी सोनूले, मनीषा राजेश्वर श्रीरामे, इंदिरा भास्कर नैतांम, शीला भरत जांभूळे व अशा अनेक भजन मंडळांनी सदस्य चिमूर तहसील कार्यालय मध्ये निवेदन देत असताना उपस्थित होते.

“कोरोना काळात कलावंतांच्या कार्यक्रमावर पूर्णतः बंदी होती. यातच अनेक कलाकारांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाचे साधन कला हीच होती. पण तीच त्यांच्या हाती नाही. यामुळे शासनाने याकडे लक्ष केंद्रित करून कलावंतांना मानधन जाहीर करावे! – शंकर रामटेके तालुका अध्यक्ष, चिमूर क्रांती सांस्कृतीक लोककला मंडळ चिमूर”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here