महाराष्ट्र पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालकांनी यादवकालीन श्री सिद्धेश्वरराच्या मंदिराची पुनर्निर्माणकरिता केली पाहणी
राजुरा तालुक्यातील ई.स.१३००-१४०० मधील प्रसिद्ध यादवकालीन श्री सिद्धेश्वरराच्या भग्नावस्थेत असलेल्या १२ ज्योतिर्लिंग मंदिराचे पुनर्निर्माण वर परिसराचा विकास करण्यासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार दि.२१ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र पुरातत्व व वस्तुसंग्रहालय मुंबई चे संचालक तेजस गर्गे, सहाय्यक संचालक श्रीमती वाहाने, आर्किटेक्चर, योगेश कासारपातील, स्मिता कासारपाटील व त्यांच्या चमूने पाहणी केली.
याप्रसंगी माजी आमदार सुदर्शन निमकर, ट्रश्ट चे अध्यक्ष राधेश्याम कुर्मावार, सचिव किरण चेनवेनवार, सतीश कोमारवेलिवार, दिलीप वांढरे, तेलिवार, जल्लावर, राम गिरावार, मधुकर आत्राम, रानु कुलमेथे, विनोद नामेवार, शिवशंकर ओझा, केशव ठाकरे, चांडणखेडे गुरुजी व प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.