पहिल्यांदाच चारचाकी घंटागाडीने बोर्डा ग्राम पंचायतीमध्ये कचरा संकलन
स्वच्छ भारत अभियानासाठी कमी खर्चात चांगल्या कामाची हमी
वरोरा : तालुक्यातील मोठी ग्राम पंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोर्डा ग्राम पंचायतीमध्ये मध्ये पहिल्यांदाच चारचाकी वाहन दाखल झाल्याने हप्त्यातून दोन दिवस सकाळी दारोदारी जाऊन हाथगाडीने कचरा संकलनासाठी होणाऱ्या त्रासदायक प्रकियेपासुन कामगारांना मुक्ति मिळणार सोबतच कंत्राटदाराने कमी पैशात चांगल्या कामाची हमी घेतल्याने ग्राम पंचायतीचा खर्चातही कपात होऊन इतर विकास कामाला गती मिळेल.
बोर्डा ग्राम पंचायतीमध्ये अगोदरच्या कंत्राटदारांकडून कामगाराकरवी हातगाडीने कचरा संकलन करण्यात येत होते.परंतु यावेळी नवीन कंत्राटदाराने १ लाख २० हजारांच्या निवेदेच्या तुलनेत ९५ हजारात कंत्राट घेतले. यात ग्राम पंचायतीची प्रतिमाही २५ हजारांची बचत होईल. शिवाय कचरा संकलनासाठी पहिल्यांदाच चारचाकी वाहनाचा वापर केला. यामुळे कमी वेळात घरोघरी जाऊन कचरा संकलन करून गावाबाहेर त्याची विल्हेवाट लावली जात असून सोबतच नाली सफाई, ओपन स्पेस परिसर व अन्य साफ सफाई नित्यनेमाने होत असल्याने नवीन कंत्राटदाराच्या कार्यशैलीबाबत ग्रामस्थ आनंद व्यक्त करीत आहेत.