स्वयंभू दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेची नवी कार्यकारणी जाहीर
गडचांदुरात तालुका स्तरीय जागतीक दिव्यांग दीन 3 डिसेंबर ला धुमधडाक्यात होईल साजरा – सतिश बिडकर
कोरपना/प्रवीण मेश्राम
स्वयंभू दिव्यांग बहुउद्देशीय संस्था गडचांदुर यांची दिनांक 17/11/2022 रोज गुरुवार ला नवीन कार्यकारणी ची निवड करण्यात आली. दोन वर्ष कोरोना महामारित सर्व कार्यक्रम बंद होते. या वर्षी सरकारने कार्यक्रमावरची सरसकट बंदी उठवली. त्यामुळे सर्व दिव्यांग बांधवानी तालुका स्तरीय 3 डिसेंबर ला जागतिक अपंग दीन हा मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्याचा निर्धार केला.
तालुका स्तरीय या कार्यक्रमा बाबत चर्चा करून स्वयंभू च्या सर्व पदाधिकारी व सदस्यामार्फत कार्यक्रमाची नियोजन बैठक पार पडली. स्वयंभू दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक सतीश बिडकर यांच्या मार्गदर्शना खाली स्वयंभू चे नवनिर्वाचित पदाधिकारी नियुक्त करण्यात आले.
अध्यक्ष म्हणून पंकज मानुसमारे, तर उपाध्यक्ष नितीन सपकाळ, सचिव प्रमोद मोहूर्ल्ले, सहसचिव पवन येंगुर्तीवर, कोश्याअध्यक्ष राजलक्ष्मी वर्भे, सहकोश्याध्यक्ष सरोजताई मडावी, संघटक सुरज बार, सहसंघटक वाजीद, तर सदस्य म्हणून मंजुनाथ शेगोकर, किशोर आत्राम, ममता निश्याद, अमोल दाते, वारलू साठवणे, विशाल शेंद्रे, नारायण शेंडे आदी सदस्यांची निवड करण्यात आली आहे.
कोरपना व जिवती तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी 3 डिसेंबर ला गांधी चौक गडचांदुर येथे सकाळी 10 वाजता उपस्थित राहावे. 11 वाजता गांधी चौक येथून रॅली ची सुरवात होऊन माता मंदिर येथे समाप्त होईल व समोरील कार्यक्रम ला सुरवात होईल.
कोरपना व जिवती तालुक्यातील सर्व दिव्यांग बाधवांची सदस्य नोदणी केली जाईल. सदस्य नोदणीसाठी दिव्यांग प्रमाणपत्र, आधार कार्ड, जन्म दाखला, राशन कार्ड, फोटो – २, उत्पन्न दाखला (जुना पण चालेल) वरील झेरॉक्स २ प्रतीत अशी कागदपत्रे सोबत घेऊन येण्यास कळविण्यात आले आहे.
अधिक माहिती साठी स्वयंभू दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष पंकज मानुसमारे (90217 30828), सचिव प्रमोद मोहुरले (94203 04152), संघटक सूरज बार (93253 90351) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थापक सतिश बिडकर यांनी केले आहे.