वढा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी कटिबध्द – आ. किशोर जोरगेवार
वढा येथे च:तुर्मास समाप्ती सोहळा सपन्न
चंद्रपूरातील माता महाकाली मंदिर आणि वढा येथील विठ्ठल रुखमाई मंदीराचा विकास करण्याच्या संकल्प आपण केला आहे. माता महाकाली मंदिराच्या विकासासाठी आपण दुस-र्या टप्यात ७५ कोटी रुपयांची मागणी केली आहे. तर वढा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी अर्थसंकल्पात जवळपास ४५ कोटी रुपये मंजुर झाले आहे. यातील २४ कोटी रुपयांच्या कामाचा आराखडा मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. विदर्भातील पंढरपुर म्हणुन ओळख असलेल वढा तिर्थक्षेत्र लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असुन या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी आपण कटिबध्द असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
वढा येथे च:तुर्मास समाप्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्येक्रमाला चैतन्य महाराज, वढा चे सरपंच किशोर वडारकर, वढा चे उपसरपंच लता गोहकार, ग्रामपंचायत सदस्य उषा मोहिजे, वनिता भोसकर, नरेंद्र पडवेकर, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष सुनिल निखाडे, उपाध्यक्ष मारोती नक्षिणे, सदस्य सुभाष गोहकार, संध्या गोहकार, पुरुषोत्तम सत्रबुध्दे, संतोष गोवारडीपे, सुधाकर वरारकर, संतोष मोहिजे, विनोद वरारकर, शंकर वराडकर, धनराज हनुमंते आदींची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, निवडून आल्यानंतर मी वढा येथे दर्शनासाठी आलो होतो. यावेळी येथे आयोजित कार्यक्रमात वढा तीर्थक्षेत्राचा विकास करण्याचा संकल्प आपल्या समक्ष विठ्ठल रुखमाईच्या साक्षीने केला होता. अर्थसंकल्पीय अधिवेशनात या विकासकामासाठी ४४.९५ कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला. लवकरात लवकर या निधीतून येथील विकासकाम सुरु करण्याच्या दिशेने माझे प्रयत्न सुरु आहे. २४ कोटी रुपयांच्या विकासकामाचा आराखडा मंजुरीसाठी शासनासला पाठविण्यात आला असल्याचे ते यावेळी म्हणाले.
वढा येथे वर्धा – पैनगंगा नदीचा संगम आहे. दोन पवित्र नदयांचा संगम हा धार्मिक दृष्याही पावण असून याचे महत्त्व अधिक आहे. या ठिकाणी भाविकांची श्रद्धा जूळली असल्याने येथे येणा-या भाविकांसाठी योग्य सोयी सुविधा झाल्या पाहिजेत या दिशेने आपले प्रयत्न सुरु आहे. पंढरपुर आणि वढा या तीर्थक्षेत्रात साम्य आहे. या दोनही ठिकाणची विठ्ठलाची मुर्ती ही स्वयंभ्रु असल्याचे ते यावेळी म्हणाले. दरवर्षी कार्तिकी एकादशीला येथे भरत असलेल्या यात्रेलाही आता भव्य स्वरुप प्राप्त झाले असुन राज्यभरातुन या यात्रेसाठी वढा येथे दर्शनाला येणाऱ्या भाविकांना अपेक्षीत असा विकास या ठिकाणी केल्या जाईल असेही ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला विठ्ठल रुखमाईच्या भक्तांसह गावक-र्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.