तलाठी कार्यालय बल्लारपूर येथे नियमित तलाठी देऊन जनतेची कामे मार्गी लावावी – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी
बल्लारपूर/रोहन कळसकर : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील तलाठी कार्यालय बल्लारपूर येथे मागील पाच ते सहा महिन्यापासून स्थानिक बल्लारपूरचे तलाठी निलंबित झाल्यामुळे प्रभारी तलाठी स्थानिक कळमना यांच्या कडे सोपविण्यात आलेले आहे, मात्र स्थानिक बल्लारपूर जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रभारी तलाठी सक्षम नाही. त्यामुळे जनतेची फेरफार संबंधि बरीच कामे खोळंबलेली आहेत. उत्पन्न दाखला मिळवण्याकरिता दोन ते तीन दिवस तलाठी यांची वाट पाहावी लागते, जनतेच्या वारंवार तलाठी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत असल्यामुळे त्रस्त झालेली आहेत.
या करिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बल्लारपूर पक्षाचे कार्याध्यक्ष इंजि. राकेश सोमाणी, संजय गांधी निराधार योजना सदस्य सुमित (गोलू) डोहणे, आदिवासी सेल बल्लारपूर अध्यक्ष भाग्यवान मेश्राम, अंकीत निवलकर, बबलू पठाण, सौंदर्य ढोके यांनी या गोष्टीचीं बाब घेता तलाठी कार्यालय बल्लारपूर येथे नियमित तलाठी देऊन जनतेची कामे मार्गी लावण्यात यावी अशी मागणी नायब तहसीलदार साळवे यांना निवेदन देउन करण्यात आली.