घुग्घुस काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी भारत जोडो यात्रेत सहभागी
घुग्घुस : काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर साडे तीन हजार किलोमीटरची पदयात्रा काढण्यात आली आहे.
देशात वाढत असलेली असहिष्णुता बेरोजगारी, महांगाई, महिला अत्याचार विरोधात तसेच देशाला एकसंघ करण्यासाठी भारत जोडो यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही यात्रा 07 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात दाखल झाली असून 20 नोव्हेंबर पर्यंत ही यात्रा महाराष्ट्रात राहणार आहे.
दिनांक 14 नोव्हेंबर रोजी माजी मंत्री विजय वड्डेटीवार, खासदार बाळू भाऊ धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते कण्हेरगाव नाका जि.हिंगोली येथे शामिल झाले व वाशीम करीता निघाले