फिटनेस वाढवण्यासाठी खेळ आवश्यक: आ. किशोर जोरगेवार
40 वर्षांवरील खेळाडूंसाठी लाईफ फाऊंडेशनच्या वतीने आयोजित लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचा पुरस्कार वितरणाने समारोप
रंगीले संघाने जिंकली सिनिअर चॅम्पियन्स ट्रॉफी
40 वर्षानंतर आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असते. परंतु धावपडीच्या जिवणामुळे नेमके याच वयात आपले आरोग्याकडे दुर्लक्ष होते. फिटनेस वाढविण्यासाठी खेळ आवश्यक आहे. हिच बाब लक्षात घेता लाईफ फाऊंडेशनच्या वतीने 40 वर्षांवरील खेडाळुंसाठी आयोजित केलेली हि क्रिकेट स्पर्धा केवळ मनोरंजनासाठी नसुन या खेडाळुंच्या शारीरिक व्यायामासाठी महत्वपूर्ण आहे. या फाऊंडेशचा हा उपक्रम कौतुकास्पद असुन असे आयोजन नियमित करावे असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
40 वर्षांवरील खेळाडूंसाठी लाईफ फाऊंडेशनतर्फे सेंट मायकेल शाळा मैदानावर सिनिअर चॅम्पियन्स लेदरबॉल टी ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आज या स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी लाईफ फाऊंडेशनचे संजय तुमराम, आरिफ खान, नाहीद सिद्दीकी, सुनील रेड्डी, बॉबी दीक्षित, आशीष अंबाडे, किशोर भट्टाचार्य, रईस काजी, शैलेंद्र भोयर, कमल जोरा, वसीम शेख, प्रकाश सुर्वे आदींची उपस्थिती होती.
40 वर्षांवरील खेळाडूंसाठी लाईफ फाऊंडेशनतर्फे आयोजित सिनिअर चॅम्पियन्स लेदर बॉल टी ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्याच चषकावर रंगीले संघाने नाव कोरले. शौकीन संघ उपविजेता ठरला. चंद्रपूरच्या सेंट मायकेल शाळा मैदानावर शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या उत्कंठावर्धक अंतिम सामन्याने क्रिकेट शौकिनांना आगळीवेगळी मेजवानी मिळाली. यावेळी झालेल्या पारितोषिक वितरण कार्यक्रमाला चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते विजेत्या आणि उपविजेत्या संघाला चषक आणि रोख रक्कम देऊन पुरस्कृत करण्यात आले. यावेळी आमदार जोरगेवार यांनी स्पर्धेच्या संकल्पनेचे कौतुक करीत खेळाडूंना 40 वर्षानंतरही अशा स्पर्धा खेळण्याची प्रेरणा यातून मिळेल, अशी आशा व्यक्त केली. पुढच्या वर्षी यापेक्षा भव्य आयोजन करा, असे सांगतानाच त्यांनी फिटनेसचे महत्त्वही यावेळी उपस्थित खेळाडूंना पटवून दिले.
दरम्यान, या स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी करणारा प्रवीण तामगडे, सामनावीर आशीष गुप्ता आणि विशेष कामगिरी करणारा सुमीत पॉल यांना गौरवण्यात आले. विजेत्या संघाचे कर्णधार डॉ. चेतन कुटेमाटे, तर उपविजेत्या संघाचे कर्णधार संदीप शिंदे यांनी चषक उंचावून जल्लोष साजरा केला. स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष होते. पण तरीही चाळीशी पार केलेल्या खेळाडूंनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आपल्यातील कौशल्याची चुणूक दाखवली. स्पर्धेची संकल्पना लाईफ फाऊंडेशनचे डॉ. किशोर भट्टाचार्य आणि नाहीद सिद्दीकी यांनी यशस्वीपणे राबवली. मराठी समालोचन कोमील मडावी, स्कोअरिंग आशुतोष चिमुरकर, तर पंच म्हणून भरत भजभुजे आणि प्रकाश कामडी यांनी जबाबदारी सांभाळली.