राहुल गांधी यांची पदयात्रा, एक विश्वविक्रम…
अहमदनगर
संगमनेर
ज्ञानेश्वर गायकर पाटील
राहुल गांधी यांची पदयात्रा सध्या महाराष्ट्रात चालू आहे, या यात्रेला जनते मधून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. अद्याप कोणाच्या ही यात्रेला इतका प्रतिसाद मिळाला नव्हता. भारताचे पूर्व प्रधानमंत्री चंद्रशेखर यांनी अशीच यात्रा काढली होती , भाजप चे ज्येष्ठ नेते की ज्यांनी भाजपची मुळे भारतात रुजवली असे लालकृष्ण अडवाणी यांनी ही रथ यात्रा काढली होती. या दोघांच्या तुलनेने राहुल किती सरस आहेत याचे साक्षीदार आमची पिढी आहे.अतोट गर्दी, सर्व समाज स्थरातून मिळणारा प्रतिसाद , युवा वर्गाचा , महिलांचा मोठा समावेश या राहुल यांच्या यात्रेच्या जमेच्या बाजू आहेत. मुळातच यात्रा “भारत जोड यात्रा” आहे. खरच भारत जोडण्याची आवश्यकता आहे का? असा प्रश्न सर्व सामान्य माणसाला पडला आहे. आज भारत जोडण्याची नक्कीच आवश्यकता आहे ,असे अनेकांना वाटते.तशी करणे ही आहेत.देशात सध्या मोठ्या प्रमाणात अराजकता माजली आहे, विरोधी पक्षाचा नायनाट खोटं आरोप करून , जेल मध्ये डांबून कसे करता येईल . खोके देऊन आमदार फोडणे, केंद्रीय तपास यत्रणांनी धुमाकूळ घालून खोटं नाटे आरोप करून त्यांना जेरबंद करणे. समाजात जातीय, धार्मिक दरी निर्माण करणे , घटनेची पायमल्ली करणे, संस्कृती व इतिहास याचे विकृतीकरण करणे, भाईचारा नष्ट कसा होईल असा प्रचार करणे.महागाई वाढवणे, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात निर्माण करणे. ठराविक उद्योगपती यांना प्रचंड कर्ज माफ करणे,शेतकरी कामगार वाऱ्यावर सोडणे आदी बाबी यात आहेत म्हणून पुन्हा एकदा जुलमशही विरोधी भारत जोड यात्रा करणे गरजेचे होते ,ते पवित्र काम राहुल गांधी यांनी केले आहे. मोदींची जुलमी , अत्याचारी , भ्रष्ट राजवट उलथून टाकण्यासाठी या यात्रेला मोठा प्रतिसाद सर्वच राज्यात मिळत आहे.
ही यात्रा ऐतिहासिक तर आहेच, शिवाय जागतिक रेकॉर्ड करणारी ठरणारी आहे. तब्बल १५० दिवस चालणारी यात्रा सुमारे १२ राज्य व दोन केंद्र शासित प्रदेश कव्हर करणार आहे.एकूण ३५०० किमी चा प्रवास असून, कन्याकुमारी ते काश्मीर अशी ही यात्रा पार पडत आहे. लालकृष्ण अडवाणी , चंद्रशेखर यांच्या यात्रा आजच्या पिढीने ठळक पाहिल्या आहेत. त्या पेक्षा मोठा प्रतिसाद राहुल यांच्या यात्रेस आहे.
राज्यात ही यात्रा ७ ते २० नोव्हेंबर पर्यंत असणार आहे , ३८२ किमी चा टप्पा पार केला जाणार आहे. तिंनखुटी येथून ती मध्यप्रदेश मध्ये प्रवेश करेल,तर देगलुर येथे तेलंगणा मधून प्रवेश केला आहे.गजानन महाराज यांच्या शेगाव मधून आशिर्वाद घेऊन ही यात्रा मार्गस्थ होईल.
यात्रेतील तरुण पिढी चा सहभाग जबरदस्त आहे. स्थानिक महिला यांची मोठी झेप यात्रेत दिसते. प्रतेक गावात एक नव चैत्यनं स्फुरले आहे. शेतकरी , कष्टकरी यांची मुले , वंचित घटक, आदिवासी, बहुजन समाज या यात्रेत सहभागी होत आहे. या यात्रेत राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावरील तेज पाहून वेगळीच स्फूर्ती तरुण यांच्या मनात निर्माण होत आहे. हिंगोली, नांदेड, वाशिम,अकोला , बुलठाणा या जिल्ह्यातील शेतकरी कामकरी आपली कामे सोडून यात्रेत सामील होत आहे.
राज्यात महा विकास आघाडी चे नेते यात सामील होत आहेत. राष्ट्रवादी, शिवसेना यांचे प्रमुख नेते व हजारो कार्यकर्ते रोज सामील होत आहेत.
देश नव्याने जोडण्याची नितांत गरज होती, ती राहुल गांधी करत आहेत, मोदी यांच्या जुलमी कारभाराला मोठी चपराक बसणार आहे. अधोगती कडे गेलेला देश पुन्हा संपन्न होईल ही अशा या यात्रे निमित्त बाळगू या, भाजप चे जुलमी सरकार घालवू या….
dmgaykar@gmail.com