देशात पहिले दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्रात…
दिव्यांग बांधवांचा पेढे वाटून आनंदोत्सव साजरा
माजी मंत्री बच्चू कडूनचे मानले आभार!
कोरपना/प्रवीण मेश्राम
गेल्या दोन वर्षात कोरोना मुळे कोणतेही कार्यक्रम घेता आले नाही. दिनांक 12/11/2022 तीन वर्षांनी सर्व अपंग बांधव एकत्र आले. दरम्यान सतीश बिडकर, प्रमोद मोहूर्ले, नितीन सपकाळ यांनी मार्गदर्शन केले.
दिव्यांगांसाठी महाराष्ट्रातील पहिले स्वतंत्र मंत्रालय होत असल्याची माहिती त्यांनी दिली. या आनंदात दिव्यांग बांधवांना पेढे वाटून जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच आगामी जागतिक अपंग दिनानिमित्त ३ डिसेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यात आली.
सभेचे आयोजक सतीश बिडकर, प्रमोद मोहुर्ले, नितीन सभेला उपस्थित सदस्य मंजुनाथ शेगोकार, पवन येनगुंटीवार, वाजिद शेख, साठवणे, धरमपाल केवट, हनुमंत शेंडे, साजित हलदर, महादेव विश्वास, राजलक्ष्मी वरभे, सूरज बार, आणि ममता निषाद सभेला उपस्थित सर्व सभासदांचे प्रहार दिव्यांग संघटना तर्फे आभार व्यक्त करण्यात आले.