गुरु नानक देवजी यांनी दिलेली बंधुता, नम्रता आणि सहिष्णुतेची शिकवण शिख बांधवांनी जपली – आ. किशोर जोरगेवार

0
618

गुरु नानक देवजी यांनी दिलेली बंधुता, नम्रता आणि सहिष्णुतेची शिकवण शिख बांधवांनी जपली – आ. किशोर जोरगेवार

गुरु नानक जयंती निमित्त गुरुद्वारा गुरु नानक दरबार मध्ये कार्यक्रमाचे आयोजन

 

गुरु नानक देवजी यांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले. त्यांच्या विचारांवर समाज पूढे जात असुन त्यांनी दिलेली सार्वभोम बंधुता, प्रेम, नम्रता, साधेपणा, समानता आणि सहिष्णुता ही शिकवण समाजाने जपली असुन यातुनच समाज बांधवांच्या वतीने सेवाभावी कार्य केल्या जात असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

गुरु नानक जयंती निमित्त गुरुद्वारा गुरु नानक दरबार मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार उपस्थित झाले होते. यावेळी गुरभींदर सिंग अरोरा, जसबिर सिंग सैनी, रणजीत सिंग सलुजा, अजित सिंगजी ढिल्लन, लजिंदर सिंग गडोक, बलदेव सिंग गोहल, कुलदीप सिंग धुन्ना, राजेंदर सिंग सलुजा, अवतार सिंग जुनेजा, परविंदर सिंग उप्पल, जतिंदर सिंग साहनी, हरविंदर सिंग धुन्नाजी यांच्यासह समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
अनेक सामाजिक धार्मिक कार्यक्रमात शिख समाज बांधव मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. संकट समयी हा समाज नेहमी समाजाच्या मदतीसाठी तत्पर असतो. या समाजाचा सेवाभाव अनेकांसाठी प्रेरणादायी असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. कोरोनाचा प्रकोप सुरु असतांना शिख समाज मदतीसाठी समोर आला. गरजुपर्यंत समाज बांधवांच्या वतीने भोजन पोहचविण्याचे काम करण्यात आले. आपण महाकाली महोत्सवाचे आयोजन केले होते. या चार दिवसीय आयोजनात सहभागी भक्तांच्या आणि सेवकांच्या भोजणाची व्यवस्था करण्याची मोठी अडचण महाकाली महोत्सव समिती पुढे निर्माण झाली होती. यावेळीही शिख समाजाच्या वतीने स्वेच्छेने मदतीचा हात पूढे करण्यात आला होता. त्यानंतर महोत्सव सेवकाच्या भोजनाची व्यवस्था आपण गुरुद्वारा येथे करु शकलो. प्रसिध्दी पासुन दुर राहत सेवा आणि फक्त सेवा करण्याचे काम समाजाच्या वतीने सुरु आहे. समाजाला सुरु असलेले हे सहकार्य कधीही विसरल्या जाणार नाही अशी भावना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली. या प्रसंगी गुरुद्वारा कमेटीच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here