वढा तिर्थक्षेत्राची विदर्भातील पंढरपूर म्हणून राज्यात ओळख निर्माण होईल – आ. किशोर जोरगेवार
वढा यात्रेत सहभागी होत विठ्ठल रुखमाईचे घेतले दर्शन
पंढरपूर प्रमाणे वढा येथे ही विठ्ठलाची स्वयंभू मूर्ती आहे. असे असतांनाही या तीर्थक्षेत्राचा अपेक्षित असा विकास झाला नाही. मात्र ही परिस्थिती आता बदलणार आहे. या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी ४५ कोटी रुपायांचा निधी मंजूर झाला आहे. त्यातील 25 कोटी रुपयांचा पहिला टप्याचा प्रस्ताव आपण मंजुरीसाठी पाठविला आहे. या निधीतून या तीर्थक्षेत्राचा विकास होणार असून होत असलेल्या या विकासकामातून भविष्यात वढा तीर्थक्षेत्राची विदर्भातील पंढरपूर म्हणून राज्यात ओळख निर्माण होईल असा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला आहे.
कार्तिकी एकादशी निमित्त वढा येथे भरलेल्या यात्रेला आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट देत विठ्ठल रुखमाईचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी सदर भावना व्यक्ती केली. यावेळी वढा चे सरपंच किशोर वडारकर, सूर्यकांत खणके, यंग चांदा ब्रिगेडचे घुग्गुस शहर संघटक विलास वनकर, विश्वजित शाहा, वढा चे उपसरपंच लता गोहकार, विचोडा उपसरपंच ऋषभ दुपारे, ग्रामपंचायत सदस्य उषा मोहिते, वनिता भोसकर, नरेंद्र पडवेकर, सेवा सहाकारी संस्थेचे अध्यक्ष सुनिल निखाडे, उपाध्यक्ष मारोती नक्षिणे, सदस्य सुभाष गोहकार, संध्या गोहकार, पुरुषोत्तम सत्रबुध्दे, संतोष गोवारडीपे, मुरलीधर हागे, विलास भगत, सुधाकर वरारकर, संतोष मोहिजे, विनोद वरारकर, विलास बोस्कर, पियुष दुपारे, तृप्तेष माशिरकर, राहुल रामटेके, सुशांत भोगेकर यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, सविता दंडारे, अस्मिता डोणारकर, आशा देशमुख, सायली येरणे, प्रेमिला बावणे, नंदा पंधरे, विमल कातकर, वंदना हजारे आदींची उपस्थिती होती.
यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले की, वढा हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून या तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. निवडून आल्या नंतर आपण काही ठराविक कामांना प्राथमिकता दिली होती. त्यात वढा तिर्थक्षेत्राचाही समावेश होता. या तिर्थक्षेत्राचा सर्वसमावेशक विकास करण्याचा मी संकल्प केला आहे. यात यश प्राप्त होत असल्याचा आनंद आहे. येथील विकासासाठी अर्थसंकल्पात ४५ कोटी रुपायांचा निधी मंजूर झाला आहे. त्यातील 25 कोटी रुपयांच्या कामाचा प्रस्ताव आपण पाठविला असून त्याचा आराखडा ही तयार करण्यात आला आहे. या तिर्थक्षेत्राचा ‘क’ गटातून ‘ब’ गटात समावेश करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे ते यावेळी म्हणाले. चंद्रपूरातील धार्मिक स्थळांना महत्व प्राप्त करुन देण्याच्या दिशेने माझे प्रयत्न सुरु आहे. चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकालीची महती राज्यात पोहचावी यासाठी आपण महाकाली महोत्सवाला सुरवात केली आहे. यंदा पहिले वर्ष असले तरी याला लाभलेला लोकसहभाग ऐतिहासीक आहे. यासोबतच वढा तिर्थक्षेत्रही आपल्याला धार्मिक आणि पर्यटनदृष्टा विकसीत करायचे आहे. यासाठी शासनस्तरावर माझे प्रयत्न सुरु आहे. यात गावक-र्यांचाही सहभाग लागणार असुन हे ठिकाण विकसीत झाल्यास वढा गावाचे धार्मिक महत्व वाढणार असुन रोजगारांच्या संधीही ग्रामस्थांना मिळणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.
यंदाची वढा यात्रा भव्य होणार याची कल्पना होती. त्यामुळे या यात्रेत येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही या दिशेने आपण प्रयत्न केले होते. यात्रेपुर्वी अधिका-र्यांचे शिष्टमंडळ आपण येथे पाठविले. त्यांनी या यात्रेचे योग्य नियोजन केले असल्याचे ते यावेळी म्हणाले. या प्रसंगी वढा यात्रेला आलेल्या भाविकांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने भोजनदान करण्यात आले. यावेळी भाविकांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली होती.