ठार मारून जागरण मचाणीवरून शेतकऱ्यास बिबट्याने नेले ओढत…
विरुर स्टे. (राजुरा) : बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाल्याची घटना विरुर स्टेशन वनपरिक्षेत्रात आज सकाळी उघडकीड आली आहे. यामुळे परिसरात चांगलीच दहशत निर्माण झाली असून जंगली जनावरांपासून पीकरक्षण कसे करायचे हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.
सविस्तर वृत्त असे की, राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन वनपरिक्षेत्रातील तुम्मागुडा येथील भीमराव भद्रू घुघलोत (52) शेतकरी जंगली जनावरांपासून शेतपिकाची नासधूस होऊ नये म्हणून शेतात उभारलेल्या मचाणीवर रात्र जगरणासाठी गेला होता. आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास बिबट्याने झोपेत असलेल्या शेतकऱ्यावर मचाणीवर चढून हल्ला चढवून ठार केले. व ओढत शेतीपासून दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर घेऊन गेला.
सदर घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वन अधिकारी व चमुंनी घटनास्थळ गाठून मौका पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी शव पाठविण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात चांगलीच दहशत निर्माण झाली असून सदर बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे.