गुरुवारी नागपूरात थाळी वाजवा आंदोलन !
आेबीसीच्या सर्व संवैधानिक मागण्यांसाठी हाेतेयं आंदोलन !
किरण घाटे
नागपूर । उद्या गुरुवार दिनांक 8 ऑक्टोबर 2020 ला राष्ट्रीय ओबीसी महासंघ नागपूर शहर तर्फे ओबीसींच्या मागण्यांसाठी लोक प्रतिनिधींच्या घरासमोर घंटा वाजवा व थाळी बजाव आंदोलन हाेवू घातले आहे.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाने साधारण सभेत घेतलेल्या निर्णयानुसार नागपूर शहरात राहणाऱ्या सर्व पक्षांच्या आमदार खासदार यांचे घरासमोर थाळी वाजवा घंटा वाजवा आंदोलन करून ओबीसी समाजाच्या मागण्या संदर्भात लोकप्रतिनिधींना जागे करण्यासाठी दि. 8.10.2020 ला सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत (लोकप्रतिनिधीच्या घरासमोर) आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आयाेजकांनी एका प्रसिध्दी पत्रकातुन दिली आहे.
या आंदोलनात महिला, पुरुष विद्यार्थी यांचा सहभाग राहणार असुन सदरहु आंदाेलनाची सकाळी 9 वाजे पासुन सुरुवात हाेत आहे आंदोलनाची रुपरेषा या प्रमाणे आहे.
● खासदार नितीन गडकरी (केंद्रीय मंत्री भारत सरकार) यांच्या निवास स्थाना समोर सकाळी 9 वाजता
● सुनील केदार यांचे घरासमाेर सकाळी 10 वाजता,
● विजय वडेट्टीवार यांचे घरासमाेर सकाळी 10.30 वाजता
● अनिल देशमुख यांचे निवास स्थाना समाेर सकाळी 11 वाजता
● नितीन राऊत यांचे घरासमाेर सकाळी 11.30 वाजता,
● देवेंद्र फडणवीस यांचे निवास स्थाना समाेर सकाळी 12 वाजता
● आमदार विकास ठाकरे यांचे घरासमाेर सकाळी 12.30 वाजता
आणि उर्वरित सर्व आमदार-खासदारांना 1 ते 1:30 च्या दरम्यान आंदोलन आणि निवेदन देऊन सायंकाळी 4 वाजता सामूहिकरित्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलन समाप्त करण्यात येणार असल्याची माहिती प्रसिध्द पत्रकात नमुद करण्यांत आली आहे.