ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात मन की बात कार्यक्रम
घुग्घुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात रविवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दूरदर्शनवरून प्रसारित होणाऱ्या मन की बात कार्यक्रमाचे आयोजन भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते.
यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे म्हणाले घुग्घुस शहरात अनेक बूथवर मन की बात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील जनतेने मन की बात कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला आहे. अनेक लोकांच्या व्यक्तिमत्वाचे दर्शन व कर्तृत्व दूरदर्शनच्या मन की बात कार्यक्रमामुळे सामान्य जनतेपर्यंत पोहोचते. केंद्रा सरकारच्या विविध योजनांची माहिती समाजापर्यंत पोहोचते.
यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे अमोल थेरे, बबलू सातपुते, नितिन काळे, प्रवीण सोदारी, कोमल ठाकरे, मनमोहन महाकाली, योगेश घोडके, राहुल बोबडे, रोहित गोरे, सिनू सुद्दाला, निलेश भोंगळे, सुरज परागे, मधुकर तलांडे, सुनंदा लिहीतकर, उमेश दडमल, शीतल कामतवार, खुशबू मेश्राम, भारती परते, नेहा कुम्मरवार उपस्थित होते.