संत नगाजी महाराज यांनी समाजाला सकारात्मक दिशा दिली – आ. किशोर जोरगेवार
नाभिक कल्याण समितीच्या वतीने श्री संत नगाजी महाराज जयंती महोत्सवाचे आयोजन
श्री संत नगाजी महाराज यांनी भजन किर्तनाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन केले. त्यांनी समाजाला सकारात्मक दिशा दिली. आज त्यांचा जयंती महोत्सव साजरा करत असतांना त्यांनी दिलेल्या विचारांची ठेवी युवा पिढी पर्यंत पोहचली पाहिजे असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
नाभिक कल्याण समितीच्या वतीने इंदिरानगर येथील परशुराम भवन येथे श्री संत नगाजी महाराज जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला समितीचे अध्यक्ष शंकरराव नक्षीणे, उपाध्यक्ष मोहनराव चांदेकर, ईश्वर लाखे, कोषाध्यक्ष नारायण आस्कर, सचिव दिनेश दैवलकर, सहसचिव भाऊराव पोवनकर, नंदु पांडे, अनिल बडवाईक, प्रेमलाल कडूकर, मोरेश्वर नागतूरे आदिंची उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलतांना आ. जारगेवार म्हणाले कि, अनेक समाज आजही आपला पारंपारिक व्यवसाय करत आहे. नाभिक समाजही यातील एक आहे. नाभिक हा सेवाकरी समाज आहे. या समाजाने समाजाची सेवा करण्याचे काम केले आहे. मात्र सेवाकरी समाज मागे पडले. आता हि परिस्थिती बदलविण्याची गरज आहे.
बदलत्या काळाबरोबर त्यांनी आपल्या व्यवसायात बदल करण्याची आवश्यकता आहे. यासाठी समाजातील पुढाऱ्यांनी वेळोवेळी कार्यशाळांचे आयोजन करावे. जयंती महोत्सव साजरा करत असतांना यातुन समाजाला कसे एकत्रित ठेवता येईल याचे नियोजन समाजाने करावे. समाजाच्या विकासासाठी यातुन प्रयत्न करावेत. लोकप्रतिनीधी म्हणून माझे नेहमी आपल्याला सहाकार्य असणार असुन समाजाच्या विकासासाठी पुर्ण शक्तीने मी तुमच्या सोबत असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी संत नगाजी महाराज यांच्या प्रतिमेला पूष्पहार अर्पण करुन त्यांना वंदन केले. या कार्यक्रमाला समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.