विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या नागरिकांचा सत्कार हा गावाकऱ्याच मोठे योगदान – माजी आमदार अँड. संजय धोटे
धानोरा येथे युथ फोरम तर्फे आयोजित युवा महोत्सव उत्साहात साजरा
कोणत्याही क्षेत्रात काम करायचे असल्यास त्या करिता युवा वर्गाची मोठी साथ हवी असते तरच प्रत्येक व्यक्ती हा कोणतेही वाटचाल करण्यास यशस्वी होऊ शकते असल्याचे मत माजी आमदार अँड संजय धोटे यांनी मार्गदर्शन प्रसंगी मांडले,राजुरा तालुक्यातील धानोरा येथे युथ फोरम ग्रुप तर्फे आयोजित युवा मोहोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड संजय धोटे हे उपस्थित होते.
युवा मोहोत्सव कार्यक्रमा प्रसंगी विविध मान्यवरांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला,विरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण यांनी उत्कृष्ट कर्तव्य बजवत अनेक नागरिकांचे जीव वाचल्यबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, भेट वस्तू तसेच स्मृतीचिन्ह देवून त्यांचा गौरव करण्यात आला,विद्युत विभागाचे मकासरे,डॉ अर्पित धोटे,गावच्या सरपंच जोशना दुर्गे,तसेच गावातील शारदा महिला मंडळाच्या भागणिनीचा,सांस्कृतिक कार्यक्रम प्रसंगी उत्कृष्ट नृत्य सादर केल्या बद्दल विद्यार्थी व विध्यार्थीनीचा तसेच जेष्ठ नागरिकांचा याप्रसंगी माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या हस्ते सत्कार करून सर्व मान्यवरांना गौरविण्यात आले.
याप्रसंगी माजी आमदार अँड संजय धोटे पुढे बोलताना म्हणाले की,धानोरा गावात प्रत्येक वर्षी फोरम ग्रुपच्या माध्यमातून गावातील तसेच परिसरातील विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात येत असते हा गावकऱ्यांसाठी मोठे योगदान असून या सर्व कार्यक्रमा करिता सचिन बलकी व त्यांच सहकारी यांचे कार्य व योगदान महत्वाचे असल्याचे यावेळी मार्गदर्शना प्रसंगी मत व्यक्त केले.मंचावर उपस्थित ईतर मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमा प्रसंगी मंचावर राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड.संजय धोटे, विरुर स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण,भाजपाचे तालुका महामंत्री प्रशांत घरोटे,विरुर भाजपा शहर अध्यक्ष भीमराव पाला,भाजपाचे जेष्ठ नेते सुरेश धोटे,ओबीसी आघाडी तालुका अध्यक्ष शंकर धनवलकर,किसान आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप बोबडे,डॉ अर्पित धोटे,भाजपा युवा मोर्चा तालुका महासचिव रवि बुरडकर,गावच्या सरपंच जोशना दुर्गे,विद्युत विभागाचे मकासरे,प्रदीप पाला,सत्यपाल दुर्गे,श्री.उपलेचीवार,श्री. जयस्वाल,पोलीस पाटील कैलास चहारे,उद्धव बलकी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक तसेच आयोजक युथ फोरम ग्रुपचे अध्यक्ष सचिन बलकी यांनी केले, कार्यक्रमाच्या यशस्वी करिता अजय खामनकर,दीपक दोरखंडे, सोपान गिरसावळे,प्रणय कारेकर, भूषण गौरकर आदींनी परिश्रम घेतले