शासनाच्या उदासीनतेमुळे ओबीसी समाज उतरणार रस्त्यावर!
राजु झाडे
ब्रम्हपुरी:- ओबीसींच्या संवैधानिक मागण्यासाठी दि 8 ऑक्टोबर 2020 ला रोज गुरुवारला आमदार, खासदार यांच्या निवासस्थानी व तहसील कार्यालय ब्रम्हपुरी येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघ ब्रम्हपुरीच्या वतीने घंटानाद आंदोलन करून निवेदन देण्यात येणार आहे. या प्रसंगी तालुक्यातील सर्व ओबीसींनी या आंदोलनात हिरीरीने सहभागी होऊन या आंदोलनाची प्रभावशीलता वाढवून बळकटी प्रदान करावे असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघा द्वारे करण्यात आले आहे.
ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, जनसंख्येच्या प्रमाणात आरक्षण बहाल करावे, राज्याने लागू केलेलं ओबीसींचे आरक्षण जसेच्या तसे सर्वच जिल्ह्यात लागू करावे, बिंदू नामावली अध्यावत करून पदे भरावी, 60 वर्ष। वयाच्या वरील ओबीसी शेतमजुरांना पेन्शन योजना, ओबीसींना घरकुल योजना लागू करावी, पदोन्नतीच्या आरक्षण लागू करावे, 1 ल्या वर्गापासून शिष्यवृत्ती लागू करावी इत्यादि मागण्या या निवेदनातून करण्यात येणार आहेत.