गडचांदूर मुख्य मार्गावर उभ्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी
सावधान काम सुरू आहे, “एक बाजू सुरू, एक बंद”
प्रतिनिधी प्रवीण मेश्राम
गडचांदूर शहरातील मुख्य मार्गावर सध्या दुरुस्तीचे काम सुरू आहे.वनवे असलेल्या या मार्गाची एक बाजू बंद करून दुसरी बाजू वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे.दररोज याठिकाणी हजारोंच्या संख्येने लहान मोठ्या वाहनांची वर्दळ सुरू असते.येथील रेल्वे गेट ते संविधान चौकापर्यंत रस्त्याच्या कडेला उभी वाहने ये-जा करणाऱ्या वाहनांना अडचणीचे ठरत आहे.मुख्य म्हणजे रेल्वे गेट ते पेट्रोल पंप चौकापर्यंत लहान मोठे मोटर रिपेरिंग गॅरेजपूढे उभी वाहने मोठ्याप्रमाणात वाहतुकीत अडथळा निर्माण करीत आहे.येथील मेकॅनिक चक्क मुख्य मार्गावरच वाहनांना उभी करून कामे करत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.विशेष म्हणजे सदर मार्गाची रुंदी कमी आहे आणि यावर दोन्ही बाजूंनी गॅरेजपूढे तसेच इतर ठिकाणी उभी वाहने अपघाताला निमंत्रण देत तर आहेच राहदारीला सुद्धा डोकेदुखी ठरत आहे.पोलिस विभागाने याकडे लक्ष देऊन मुख्य मार्ग मोकळा करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.