MJP च्या पाईपलाईन केलेल्या रस्त्यांचे जीर्णोद्धाराचे अर्धवट राहिलेले कार्य पूर्ण करा – AAP
तालुका प्रतिनिधी/रोहन कळसकर
बल्लारपूर – आम आदमी बल्लारपूरचे शहाराध्य रविकुमार पुप्पलवार यांच्या मार्गदर्शनाखाली व उपाध्यक्ष अफझल अली यांच्या नेतृत्वात उप-मुख्याधिकारी जयवंत काटकर यांना निवेदन देण्यात आले. 2019-20 या कालावधीमध्ये बल्लारपूर शहरामध्ये MJP चे शहरात नवीन पाईपलाईन टाकण्याचे कार्य करण्यात आले होते. त्याकरिता रस्त्याच्या कडेला खोदकाम करण्यात आले होते. या कार्यास जवळ जवळ तीन वर्ष लोटल्यानंतर सुद्धा त्या खोदलेल्या गड्ड्यांचे जीर्णोद्धार अजूनही करण्यात आलेले नाही. अश्या अपूर्ण कार्यामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील जीर्णोद्धार चे कार्य लवकरात लवकर पूर्णत्वास आणावे. अन्यथा या मागणीसाठी आम आदमी पक्षाला आंदोलनाचा देखील विचार करावा लागेल.
या वेळी शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार, उपाध्यक्ष अफझल अली, सचिव ज्योती बाबरे, युवा अध्यक्ष सागर कांबळे, महिला उपाध्यक्ष सलमा सिद्दीकी, संघटन मंत्री सरिता गुजर व किरनताई खन्ना, वस्ती विभाग चुनाव प्रभारी प्रा. प्रशांत वाळके जी इत्यादी उपस्थित होते.