नित्य मला सहज सुचलचे मार्गदर्शन व प्रेम मिळाले-एका अल्प मुलाखतीतुन व्यक्त केले रक्षा यांनी मनमाेकळेपणे आपले भावनिक मत!
प्रख्यात सहज सुचलच्या सदस्या रक्षा नगराळेचे येत्या ७आँक्टाेबरला २४ व्या वर्षात पदार्पण!
राळेगाव (यवतमाळ) : किरण घाटे । महाराष्ट्रातील चंद्रपूर -गडचिराेली या जुळ्या जिल्ह्यातील नामवंत महिलांचे व्यासपीठ सहज सुचल मुळे मला वेळाेवेळी माेलाचे मार्गदर्शन व जेष्ठ साहित्यिक महिला सदस्यां कडुन (मला) सदैव भरभरुन प्रेम मिळाले त्यामुळे मी आपल्या जिवनातील शैक्षणिक क्षेत्रा साेबतच साहित्य क्षेत्रात उल्लेखनिय प्रगती करु शकली असे भावनिक मत यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव निवासी तथा नवाेदित साहित्यिका रक्षा बबनराव नगराळे यानी आज संध्याकाळी एका अल्पशा मुलाखतीतुन (भ्रमण ध्वनी वरुन) बाेलतांना व्यक्त केले.
याच नवाेदित लेखिका रक्षा नगराळे उद्या बुधवार दि.७ आँक्टाेबरला वयाची २३ वर्ष पुर्ण करुन २४ व्या वर्षात पदार्पण करीत आहे .त्यांना साहित्य क्षेत्रा साेबतच संगित क्षेत्रात विशेष रुची असुन त्या सुगम संगित कार्यक्रमात सुध्दा गाेड व मधुर आवाजात गातात !
अनेक कार्यक्रमात त्यांनी आपला सहभाग नाेंदविला आहे .घरची परिस्थिती बेताचीच असुन त्यांनी आपले शिक्षण वकिली अभ्यासक्रमा पर्यंत केले आहे यंदाचे परिक्षा देण्यांचे त्यांचे अंतिम वर्ष आहे .ललित लेखन लिहण्यांचा त्यांचा मुळ छंद असुन रक्षा नगराळे या पुर्वि आंतर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झाल्या आहे .
अधिवक्ता मेघा धाेटे, मायाताई काेसरे व पत्रकार किरण घाटे यांचे मुळे मला सहज सुचल वर सन्मानाने (मानाचे) स्थान मिळाले हे शेवटी मुलाखती वेळी सांगण्यांस रक्षा नगराळे विसरल्या नाही .हे तेव्हढेच खरे !
सहज सुचल ग्रुप महिलांकरिता उत्तम असल्याचा पुनरुच्चार त्यांनी या वेळी केला .सहज सुचलला मी कधीच विसरणार नाही अश्याही रक्षा पुढे म्हणाल्या सहज सुचलचे योगदान माझेसाठी माेलाचे व अमूल्य ठरले आहे.